शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तान सोडण्यासाठी नागरिकांची धडपड, विमान हवेत असताना तीन जण पडले; पाहा धक्कादायक Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 17:03 IST

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडून पळ काढत आहेत.

अफगाणिस्तानवरतालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अफगाणिस्तानचे नागरिक देश सोडून पळ काढत आहेत. अफगाणिस्तानची राजधानी काबुल विमानतळावर नागरिकांची गर्दी झाली आहे. यात अनेकजण आपला जीव वाचवण्यासाठी विमानात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. यातच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. काबुल विमानतळावरुन अफगाण नागरिकांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं टेकऑफ झाल्यानंतर तीन नागरिक विमानात गर्दी असल्यानं जागा मिळाली नाही आणि विमानातून खाली पडले. सोशल मीडियात संबंधित घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यात आलेली नाही. 

ट्विटरवर अफगाणिस्तानातील काही पत्रकार आणि काही नागरिकांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. यात काबुल विमानतळावरुन कथित विमानाचं टेकऑफ झाल्यानंतर विमान हवेत असताना तीन नागरिक विमानातून खाली पडल्याचं दिसून येत आहे. विमान इतक्या उंचावर होतं की खाली पडलेले तिघंही जीवंत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. दरम्यान, या व्हिडिओची अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. एका स्थानिक वृत्तवाहिनीनं अफगाणी नागरिकांच्या हवाल्यानं केलेल्या दाव्यानुसार विमानातून तीन नागरिक खाली पडले आहेत. 

विमानतळावर गोळीबार, तिघांचा मृत्यूकाबुलच्या विमानतळावर प्रवासी टर्मिनलवर सोमवारी गोळीबाराची घटना घडली. यात कमीत कमी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. द वॉल स्ट्रीट जनरलच्या माहितीनुसार प्रत्यक्षदर्शींनी टर्मिनल इमारतीच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात तीन मृतदेह पाहिले आहेत. सोशल मीडियात व्हायरल होत झालेल्या व्हिडिओंमध्येही गोळीबार सुरू असल्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला आहे. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अफगाणिस्तान सोडून जाण्याच्या प्रयत्नात नागरिक विमानतळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. विमानाला चारही बाजूंनी घेरुन नागरिक विमानात जागा मिळवण्यासाठी धडपड करत असतानाचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान