शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ट्रम्प यांच्या धमकीनं चीनचा शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 300 अंकांनी कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 2:59 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर मोठं आयात शुल्क आकारण्याची धमकी दिल्यानंतर जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये भूकंप आला आहे.

बीजिंग- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवर पुन्हा मोठं आयात शुल्क आकारण्याची धमकी दिल्यानंतर जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये भूकंप आला आहे. अमेरिकेनंतर आशियाई शेअर बाजार 5 टक्क्यांहून अधिकनी कोसळला आहे. चीनचा मुख्य बेंचमार्क इंडेक्स शांघाई कंपोझिट 5.58 टक्के आणि हाँगकाँगची प्रमुख बेंचमार्क इंडेक्स हँगसँग 3.31 टक्क्यांनी पडला आहे. यादरम्यान भारतीय शेअर बाजारही गडगडला आहे.बीएसईचा 30 शेअर असलेल्या प्रमुख इंडेक्स सेन्सेक्समध्ये 310 अंकांची घट नोंदवली गेली असून, तो 38643च्या स्तरावर आहे. तर दुसरीकडे एनएसईचा 50 शेअरवाला प्रमुख इंडेक्स निफ्टी 95 अंकांची घट झाली असून, 11620च्या जवळपास आहे. चीनचा शेअर बाजारा सोमवारी 5.6 टक्क्यांनी कोसळून बंद झाला. चीनच्या सेन्सेक्समधली ही फेब्रुवारी 2016नंतरची सर्वात मोठी घट आहे. अमेरिकेकडून चीनवरच्या सामानावर आयात शुल्क वाढवण्याच्या ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे शेअर बाजार कोसळल्याचं प्रमुख कारण तज्ज्ञा सांगतायत. त्यामुळे जगभरात शेअर बाजारात घट नोंदवली गेली असून, भारतातल्या शेअर बाजारावरही याचा परिणाम जाणवला आहे.

सध्या तरी गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. शेअर बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूक केली पाहिजे, असंही त्यांनी सल्ला दिला आहे. म्युच्युअल फंडातील रक्कमही काढू नका, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर चीननंही सावध पावलं टाकण्यात सुरुवात केली आहे. चीन पुढच्या आठवड्यात होणारी बैठक रद्द करण्याच्या विचारात आहे. चीनच्या वस्तूवर असलेलं 10 टक्के आयात शुल्क आता वाढवून 25 टक्के करण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिकेनं एक प्रकारे चीनवर दबाव निर्माण केला आहे. .

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीन