शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

चीनच्या भरकटलेल्या रॉकेटचे अवशेष हिंदी महासागरात कोसळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 6:06 AM

बीजिंग : गेल्या काही दिवसांपासून जगाला चिंता लागून राहिलेल्या चिनी रॉकेटचे अवशेष अखेरीस हिंदी महासागरात मालदीवजवळ कोसळले. या घटनेत ...

बीजिंग : गेल्या काही दिवसांपासून जगाला चिंता लागून राहिलेल्या चिनी रॉकेटचे अवशेष अखेरीस हिंदी महासागरात मालदीवजवळ कोसळले. या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे चिनी तसेच अमेरिकी अवकाश संस्थांनी स्पष्ट केले आहे. अंतराळात भरकटलेल्या चिनी रॉकेटला जलसमाधी मिळाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

नेमके प्रकरण काय - - ‘लाँग मार्च ५बी’ नावाचे रॉकेट २९ एप्रिल रोजी चीनच्या हैनान प्रांतातून अवकाशात झेपावले.- त्यात ‘तिआन्ह’ हे मॉड्युल स्थापित करण्यात आले होते. चीनच्या अवकाश स्थानकासाठी ते महत्त्वाचे होते. - मिशन पूर्ण झाल्यावर ‘लाँग मार्च ५बी’ अनियंत्रित झाले.- चिनी अवकाश संस्थेचा ‘लाँग मार्च ५बी’शी संपर्क तुटला.- हे दिशाहीन रॉकेट अंतराळात भरकटले. त्यानंतर त्याचे अवशेष पृथ्वीच्या दिशेने खेचले जाऊ लागले.- रॉकेट उंची १८६ फूट आणि वजन २३ टन एवढे होते.

सगळ्यांनीच सोडला सुटकेचा नि:श्वास - अवकाशात भरकटलेले ‘लाँग मार्च ५बी’नेमके कुठे पडणार यावर अमेरिकेसह युरोपीय देशांच्या अवकाश संशोधन संस्थांचा काथ्याकूट सुरू होता.- रॉकेटचे अवशेष प्रशांत महासागर परिसरात कोसळतील असा प्राथमिक अंदाज होता.  परंतु रविवारी पहाटेच्या सुमारास हिंदी महासागरात मालदीवच्या उत्तरेकडे हे अवशेष कोसळल्याचे चीनने जाहीर केले.- रॉकेटचे बहुतांश भाग पृथ्वीच्या वातावरणात शिरताच घर्षणाने जळून गेले व उर्वरित अवशेष हिंदी महासागर परिसरात कोसळले, असे चिनी माध्यमांनी म्हटले आहे.- अमेरिकी संरक्षण मंत्रालयाच्या स्पेस कमांडनेही हिंदी महासागरात कोसळण्यापूर्वी रॉकेटचे हे अवशेष सौदी अरेबियाच्या अवकाशात होते, असे म्हटले आहे.

अंतराळातील कचरा म्हणजे काय  विविध देशांकडून शोधमोहिमेसाठी वा तांत्रिक कारणांसाठी अंतराळात उपग्रह सोडले जात असतात. कालांतराने त्यांची उपयुक्तता संपुष्टात येऊन ते निकामी होतात. असे असंख्य उपग्रह वा रॉकेट्स पृथ्वीच्या कक्षेत अंतराळात दिशाहीनपणे फिरत असतात. या सगळ्याला अंतराळातील कचरा असे संबोधले जाते.

कचरा किती प्रमाणात -- अंतराळात पृथ्वीच्या कक्षेत सुमारे २० हजार उपग्रह वा तत्सम उपकरणे, जी निकामी झाली आहेत, फिरत आहेत. त्यातील १२८ दशलक्ष तुकडे १ सेमी आकारापेक्षाही लहान आहेत.- ९ लाख तुकडे १ ते १० सेमी आकाराचे.- ३४ हजार तुकडे १० सेमीहून मोठ्या आकाराचे आहेत. यातील काही तुकडे चुंबकीय शक्तीमुळे एकत्र जोडले जातात.- अशा एकत्रित तुकड्यांना मायक्रोमिटिऑरॉइड्स असे संबोधले जाते.- हे तुकडे एखाद्या यानाच्या मार्गात आल्यास त्यामुळे उपग्रह वा यानाचे नुकसान होऊ शकते. 

टॅग्स :chinaचीन