chinese incursion into east china sea japan threatens military action against dragon | पूर्व चीन समुद्रात ड्रॅगनची घुसखोरी, जपानने दिली लष्करी कारवाईची धमकी

पूर्व चीन समुद्रात ड्रॅगनची घुसखोरी, जपानने दिली लष्करी कारवाईची धमकी

कधी काळी चीनवर ताबा मिळवलेल्या जपाननं पुन्हा एकदा बीजिंगला गंभीर इशारा दिला आहे. पूर्व चीन समुद्रातील विवादित बेटांजवळ चीनची घुसखोरी सुरूच आहे. चीनच्या मासेमारी बोटींनी अवैधरीत्या दक्षिण चिनी समुद्रात घुसखोरी केलेली असून, जपानने चीनला गंभीर इशारा दिला आहे. जपानने म्हटले आहे की, जपानी सैन्य चिनी बोटींच्या हल्ल्याला प्रतिसाद देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. चीनने दिआओयू बेटांकडे जाण्यासाठी मासेमारी करणा-या नौकांना परवानगी दिली आहे. त्यामुळेच जपाननं त्यांना गंभीर इशारा दिला आहे. 

दुसरीकडे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चिनी मासेमारी करणार्‍या जहाजांची संख्या 100पर्यंत आहे आणि चिनी तटरक्षक दलाने त्यांचे समर्थन केले आहे, तर जपानी सैन्याला प्रत्युत्तर देणे फार कठीण जाईल. चीनने जपानला सांगितले आहे की, चिनी जहाजांवरची त्यांची बंदी 16 ऑगस्टला संपुष्टात येत आहे. दिआओयू  बेटांवर आपला हक्क असल्याचा दावा चीनने केला आहे आणि मासेमारी जहाजांना थांबवणार नसल्याचाही उल्लेख केला आहे. 
जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनो म्हणाले की, चीनच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी लष्कर सज्ज आहे. यापूर्वी 2016मध्ये चिनी कोस्ट गार्डच्या 72 जहाजे आणि 28 जहाजांनी चार दिवसांपासून या भागात घुसखोरी केली होती. गेल्या 18 महिन्यांपासून चिनी कोस्टगार्ड जहाजं जपानवर सतत दबाव वाढवत  होते. जपानकडून वारंवार विनंती करूनही चिनी जहाज 111 दिवस या भागात सतत राहिले.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पूर्व दिशानिर्देशातील जपानी तटरक्षक दलाला चीन बदलू इच्छित असून, या दिआओयू बेटे पुन्हा ताब्यात घेऊ इच्छित आहेत. या माध्यमातून चीनला या बेटांवरची सत्ता बदलण्याची इच्छा आहे. जर चीनने असे केले तर जपानसाठी ते फारच अवघड जाईल. या भागातील रशियाच्या नौदल आणि उत्तर कोरियामधील घुसखोरांशी जपानला आधीच सामोरे जावे लागत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: chinese incursion into east china sea japan threatens military action against dragon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.