बाबो! चीनमध्ये चक्क 'मच्छर फॅक्ट्री'; आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास, नेमकं चाललंय तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 19:32 IST2021-09-10T19:20:26+5:302021-09-10T19:32:37+5:30
Chinese factory breeding 20 million good mosquito every week 3 : फॅक्ट्रीमध्ये आठवड्याला जवळपास 2 कोटी डासांची पैदास केली जाते. या पैदास केलेल्या डासांमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरिया असतात.

बाबो! चीनमध्ये चक्क 'मच्छर फॅक्ट्री'; आठवड्याला 2 कोटी डासांची पैदास, नेमकं चाललंय तरी काय?
डासांमुळे अनेक गंभीर आजार होतात. मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार फक्त डासांमुळे पसरतात. या आजारांमुळे दरवर्षी अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र, चीनमध्ये तर चक्क मच्छरची फॅक्ट्री आहे आणि दर आठवड्याला तब्बल 2 कोटी डास तयार केले जातात. चीनमध्ये डासांमुळे वाढलेले रोग कमी करण्यासाठी आणि मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार कमी करण्यासाठी या डासांची पैदास केली जाते जे डास रोगराई पसरवतात त्यांना हे चांगले डास संपवतात. याबाबत एक रिसर्च करण्यात आला असून त्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे.
चीनच्या दक्षिण परिसरातील गुआंगझोऊमध्ये ही मच्छरची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये आठवड्याला जवळपास 2 कोटी डासांची पैदास केली जाते. या पैदास केलेल्या डासांमध्ये वोल्बाचिया बॅक्टेरिया असतात. या डासांना वोलबेचिया मॉस्किटो असं म्हटलं जातं. या डासांना गुआंगझोऊच्या फॅक्ट्रीत प्रजनन करतात. मग ते जंगलात आणि अशा ठिकाणी सोडले जाते जेथे डास मोठ्या प्रमाणात असतात. फॅक्टरी-प्रजनित डास मादी डासांमध्ये मिसळतात आणि त्यांची प्रजनन क्षमता नष्ट करतात. याच कारणामुळे मग त्या भागात डास कमी होऊ लागतात आणि यामुळे रोगांना प्रतिबंध होतो.
प्रत्येक कार्यशाळेमध्ये आठवड्याला 50 लाख डासांची निर्मिती
डासांची निर्मिती करणारी ही चीमधील फॅक्ट्री जगातील सर्वात मोठी फॅक्ट्री आहे. ही 3500 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे. यात 4 मोठ्या कार्यशाळा आहेत. प्रत्येक कार्यशाळेमध्ये दर आठवड्याला सुमारे 50 लाख डासांची निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे चीमधील ही फॅक्ट्री गेल्या 6 वर्षांपासून डासांची पैदास करते. 2015 पासून ही फॅक्ट्री सुरू आहे. या फॅक्ट्रीमध्ये पैदास होणारे डास आवाज खूप जास्त करतात. मात्र त्या डासांपासून कुठल्याही प्रकारचे रोग पसरत नाहीत हे विशेष आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.