Corona Virus : चीनने वाढवलं जगाचं टेन्शन, आढळला कोरोनासारखाच व्हायरस; प्राण्यांपासून माणसांमध्ये संसर्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 10:33 IST2025-02-22T10:33:17+5:302025-02-22T10:33:29+5:30

Corona Virus : चीनमधील तज्ज्ञांच्या एका टीमने वटवाघळांमध्ये एक नवीन कोरोना व्हायरस आढळल्याचा दावा केला आहे. हा व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये देखील पसरू शकतो

chinese experts team discovered new corona virus in bat could be transmitted into human like covid 19 | Corona Virus : चीनने वाढवलं जगाचं टेन्शन, आढळला कोरोनासारखाच व्हायरस; प्राण्यांपासून माणसांमध्ये संसर्ग?

Corona Virus : चीनने वाढवलं जगाचं टेन्शन, आढळला कोरोनासारखाच व्हायरस; प्राण्यांपासून माणसांमध्ये संसर्ग?

चीनमधील तज्ज्ञांच्या एका टीमने वटवाघळांमध्ये एक नवीन कोरोना व्हायरस आढळल्याचा दावा केला आहे. हा व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये देखील पसरू शकतो. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मानवी रिसेप्टर वापर केला जातो जे कोरोनाचं कारण ठरतात. अशा परिस्थितीत आता अशी भीती व्यक्त केली जात आहे की, कोरोना व्हायरस पुन्हा जगात पसरणार आहे का?

बॅटवुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शी झेंगली यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने हा नवीन व्हायरस शोधला आहे. झेंगली हे ग्वांगझू लॅबोरटरीचे प्रमुख वायरोलॉजिस्ट आहेत, ज्यांचा रिसर्च मंगळवारी (१८ फेब्रुवारी) सेल जर्नलमध्ये पब्लिश झाला आहे.

कोरोना व्हायरसचा नवा प्रकार सापडला

साउथ चायना मॉर्निंग साउथ पोस्टच्या अहवालानुसार, संशोधनात असं म्हटलं आहे की, नवीन HKU5 हा एक नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे, जो पहिल्यांदा हाँगकाँगमध्ये जपानी पिपिस्ट्रेल वटवाघळांमध्ये आढळला होता. हे वटवाघुळाच्या मार्बेकोव्हायरस उपवंशातून येतात. यामध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (MERS) कारणीभूत असलेल्या व्हायरसचा देखील समावेश आहे. हा व्हायरस कोरोना व्हायरस वापरत असलेल्या ACE2 रिसेप्टरला जोडतो. संशोधकांनी सांगितलं की, हा व्हायरस मानवांमध्ये पसरण्याचा धोका जास्त आहे, जरी तो कोरोना इतका धोकादायक नाही.

हा व्हायरस मानवांमध्ये पसरण्याचा धोका जास्त 

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आम्ही HKU5-CoV च्या वेगळ्या वंशाचा (वंश-2) शोध लावल्याची नोंद केली आहे, जो केवळ वटवाघळांपासून वटवाघळांपर्यंतच नाही तर मानवांमध्ये आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये देखील सहजपणे पसरू शकतो. तज्ज्ञांनी सांगितलं की, जेव्हा वटवाघळांच्या नमुन्यांमधून व्हायरस वेगळा केला गेला तेव्हा त्याने मानवी पेशी तसेच कृत्रिमरित्या वाढवलेल्या पेशींना संसर्गित केले. वटवाघळांपासून मानवांमध्ये या व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे, जो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संक्रमणाद्वारे देखील पसरू शकतो. 

Web Title: chinese experts team discovered new corona virus in bat could be transmitted into human like covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.