चीनच्या अत्याधुनिक लोंघुशान युद्धनौकेला लागली आग, खरं कारण लपवतोय ड्रॅगन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 19:53 IST2023-11-22T19:52:57+5:302023-11-22T19:53:05+5:30
China News: जगातील सर्वात आधुनिक अशा लँडिंग शिपपैकी एक असलेल्या लोंघुशानमध्ये आग लागली आहे. हे चीनचं टाइप ०७१ चं लँडिंग शिप आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

चीनच्या अत्याधुनिक लोंघुशान युद्धनौकेला लागली आग, खरं कारण लपवतोय ड्रॅगन
जगातील सर्वात आधुनिक अशा लँडिंग शिपपैकी एक असलेल्या लोंघुशानमध्ये आग लागली आहे. हे चीनचं टाइप ०७१ चं लँडिंग शिप आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात या जहाजामधून मोठ्या प्रमाणावर धूर येताना दिसत आहे. मात्र त्याच्या आजूबाजूला आग शमवणारे टँकर किंवा हेलिकॉप्टर दिसत नाही आहे.
Type 071 ला नाटोमध्ये Yuzhao संबोधलं जातं. ही एक एंफिबियस ट्रान्सपोर्ट डॉक शिप आहे. ते चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नौदलाची युद्ध नौका आहे. २०१७ पासून ती तैनात आहे. तिला पूर्व समुद्रात तैनात करण्यात आलेलं आहे. या जहाजाचं डिस्प्लेसमेंट २५ हजार टन आहे. ते सुमारे ६९० फूट लांब आहे. या युद्धनौकेवर चार Z-9 सुपर फाल्कन हेवी ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर तैनात असतात.
टाइप ०७१ मध्ये अशा प्रकारच्या युद्धनौका आहेत. यामध्ये लोंघुशानचा क्रमांक ९८० आहे. ही युद्धनौका ४६ किमी प्रतितास वेगाने पाण्यामधून प्रवास करते. जर ३३ किमी प्रति तास वेगाने चालवली तर तिची रेंज १९ हजार किमी एवढी आहे.