स्वत:च्याच रणनीतीमध्ये अडकला चीन; सरकारच्या नव्या आकडेवारीनं चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:44 IST2024-01-17T15:43:45+5:302024-01-17T15:44:24+5:30
वन चाईल्ड धोरणामुळे चीनच्या जन्मदरात वेगाने घट झाली. आता जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे देश लोकसंख्येतील घट यामुळे चिंतेत आहे.

स्वत:च्याच रणनीतीमध्ये अडकला चीन; सरकारच्या नव्या आकडेवारीनं चिंता वाढली
सातत्याने लोकसंख्येत होणारी घट पाहता चीनची चिंता वाढली आहे. बुधवारी चीनच्या सरकारने वार्षिक आकडेवारी जारी केली. त्यानुसार चीनमध्ये २०२३ मध्ये तब्बल २० लाख लोकसंख्या घटली आहे. मागील ६ दशकात पहिल्यांदा २०२२ मध्ये चीनच्या लोकसंख्येत घट झाली होती. त्याचे कारण म्हणजे चीनच्या जन्मदरात मोठी घट झाली होती. काही वर्षापूर्वी चीने वाढती लोकसंख्या पाहता देशात वन चाईल्ड पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
वन चाईल्ड धोरणामुळे चीनच्या जन्मदरात वेगाने घट झाली. आता जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे देश लोकसंख्येतील घट यामुळे चिंतेत आहे. आगामी काही वर्षात चीनमधील ही समस्या आणखी बिकट होणार आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्येच्या रिपोर्टनुसार, भारताने आता चीनला मागे टाक लोकसंख्येच्या बाबतीत जगात सर्वात मोठा देश बनला आहे. भारताची लोकसंख्या मागील वर्ष १४२.८६ कोटी नोंदवली आहे. चीनची लोकसंख्या १४० कोटी होती. चीनच्या नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिक्सच्या आकडेवारीत चीनमध्ये मागील वर्षी ९० लाख मुले जन्माला आली जी २०२२ च्या तुलनेत जन्मलेल्या ९५.६ लाख मुलांच्या ५ टक्क्याने कमी आहे.
आव्हानाला तोंड देण्यासाठी चीन सरकारची नवी योजना
घटत्या लोकसंख्येमुळे चीन आता गंभीर विचार करत आहे. त्यामुळे मे २०२१ मध्ये चीन सरकारने लोकसंख्या वाढीसाठी ३ मुलांची पॉलिसी लागू केली. चीन सरकारने त्यांच्या अनेक प्रांतात जन्म दर वाढवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या अपत्यांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन योजना आणल्या. जेणेकरून जोडपे मुलांना जन्म देऊ शकतील. परंतु आता आलेल्या आकडेवारीत या योजनांचा चीनमध्ये जास्त परिणाम न झाल्याचे दिसून येते. चीनमध्ये २०१६ पासून लोकसंख्या विकास दर कमी झाला आहे कारण मुलांच्या पालन पोषण, शिक्षणाचा खर्च वाढला आहे. या जीवनशैलीमुळे युवा जोडपे मूल जन्माला घालण्यापासून दूर आहेत अथवा लग्नही केली जात नाहीत.