शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनला तडाखा; चीनचा विकास दर ३० वर्षांतील निच्चांकी पातळीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 15:20 IST

अमेरिकेविरुद्धच्या व्यापार युद्धाचा फटका

नवी दिल्ली: अमेरिकेविरुद्धच्या व्यापार युद्धाचा मोठा फटका चीनला बसला आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या सकल वार्षिक उत्पन्न वाढीचा वेग मंदावला आहे. चीनच्या जीडीपी वाढीचा वेग ६.२ टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे चीनच्या जीडीपीनं गेल्या ३० वर्षांमधील निच्चांक गाठला आहे. चिनी दैनिक साऊथ चायना मॉर्निंगनं चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चिनी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ६.२ टक्के असल्याचं म्हटलं. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हाच वेग ६.४ टक्के होता, असंदेखील वृत्तपत्रानं म्हटलं आहे. त्यासाठी नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीचा संदर्भ देण्यात आला आहे. चीनचे प्रीमियर ली केकियांग यांनी देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग ६ ते ६.५ टक्के राहील, असा अंदाज मार्चमध्ये व्यक्त केला होता. त्यानुसार चीनच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग योग्य असल्याचं म्हटलं. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संबंध सध्या ताणले गेले आहेत. दोन्ही देशातील व्यापार युद्धाचा परिणाम चिनी अर्थव्यवस्थेवर होऊ लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी उत्पादनांवरील शुल्क वाढवलं आहे. त्यामुळे चिनी उत्पादनं महाग झाली आहेत. जूनमध्ये निर्यातीत १.२ टक्क्यांची घट झाल्याचं चीन सरकारकडून गेल्या शुक्रवारी सांगण्यात आलं होतं.  

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाchinaचीन