चीनला ६.१ रेक्टर स्केल भूकंपाचे हादरे, जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: January 21, 2016 08:13 IST2016-01-21T04:54:23+5:302016-01-21T08:13:07+5:30
मध्य चीन मध्ये जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री १२ च्या सुमारास भूकंप झाल्याचं समजतं आहे.

चीनला ६.१ रेक्टर स्केल भूकंपाचे हादरे, जनजीवन विस्कळीत
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. २१ - मध्य चीन मध्ये जोरदार भूकंपाचे धक्के बसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री १२ च्या सुमारास भूकंप झाल्याचं समजतं आहे. रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार भूूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल एवढी होती.
चीनच्या माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार (न्यूज एजेंसी शिन्हुआ) चीनमधील किघाई जवळील मेनयुआन काउंटी मध्ये जमीनीच्या आत १० किलोमीटर खोल भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या भूकंपात जिवीतहानी झाल्याचं वृत्त नाही.
माध्यमांच्या वृत्तानुसार मेनयुआन काउंटीत मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये एकच घबराट पसरली आणि गोंधळ निर्माण झाला.