हिरोशिमा-नागासाकी विसरलात का? चीनची जपानला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:51 IST2025-03-07T15:48:18+5:302025-03-07T15:51:21+5:30
चीनने यापूर्वी जपानच्या सीमेवर लढाऊ विमाने आणि युद्धनौका पाठवल्या होत्या.

हिरोशिमा-नागासाकी विसरलात का? चीनची जपानला अणुबॉम्ब टाकण्याची धमकी, कारण काय..?
China warns Japan : एकीकडे तैवानसोबत वाढता वाद आणि दुसरीकडे चीनचीजपानला मोठी धमकी दिली आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी जपानवर चक्क अणुबॉम्बने हल्ला करण्याची धमकी दिली आहे. जपानने हिरोशिमा आणि नागासाकीचा इतिहास विसरू नये. त्यापेक्षाही जास्त वेदना देऊ, असे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अमेरिकन टॅरिफबाबत बोलताना जपानवर निशाणा साधला. वांग यी म्हणाले, जपानच्या हिरोशिमावरील अणु हल्ल्याला 80 वर्षे पूर्ण होत आहे. आम्ही त्याबद्दल शोक व्यक्त करतो, परंतु जपानने सुधारणा केली नाही, तर आम्ही त्यापेक्षा जास्त वेदना देऊ.
चीनचे परराष्ट्र मंत्री पुढे म्हणतात, तैवान हा आपल्या देशाचा भाग आहे. तैवानचे लोक टोकियोच्या जीवावर उड्या मारत आहेत.जपान जाणूनबुजून चीनमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत चीन गप्प बसणार नाही.
आशिया खंडातील कोणत्याही देशामध्ये शत्रुत्व नाही. इथे सर्व काही ठीक आहे. संपूर्ण जगात संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने आहोत आणि भविष्यासाठीही हेच हवे आहे. 3 वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपावे आणि दोन्ही देशांमध्ये शांतता करार व्हावा, अशी चीनची इच्छा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
यापूर्वी दोनदा धमकी दिली
गेल्या काही महिन्यांत चीनने दोनवेळा जपानला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने जपानच्या सीमेवर लढाऊ विमाने आणि युद्धनौका पाठवल्या होत्या.