शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

जगाला अंधारात ठेवून डोकलाममध्ये चीनकडून पुन्हा हालचाली, अमेरिकन अधिकाऱ्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 6:13 PM

चीनच्या सैन्याने डोकलामच्या पठारावर घुसखोरी  करून रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता.

वॉशिंग्टन - चीनच्या सैन्याने डोकलामच्या पठारावर घुसखोरी  करून रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेरीस 73 दिवसांच्या गतिरोधानंतर हा वाद निवळला होता. दरम्यान, चीनने डोकलाममध्ये पुन्हा हालचाली सुरू केल्या असून, आतापर्यंत भारत आणि भूतान यापैकी कुणीही त्यांना रोखलेले नाही, असा दावा अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रात चीनकडून सुरू असलेल्या युद्धसरावाची तुलना या अधिकाऱ्याने हिमालयीन क्षेत्रात चीनकडून सुरू असलेल्या कुरापतींशी केली आहे.  अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रमुख उपसहाय्यक ( दक्षिण आणि मध्य आशिया) एलिस जी. वेल्स यांनी एका संसदीय सुनावणीदरम्यान सांगितले की, माझ्या मते भारत भक्कमपणए आपल्या उत्तर सीमेचे रक्षण करत आहे. अशा परिस्थितीत चीनच्या या हालचाली भारतासाठी चिंतेचा विषय आहे.महिला खासदार एन. व्हेनगर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वेल्स यांनी सांगितले की, भारत जर सामरिक दृष्ट्या स्थिर राहिला तर निश्चितपणे आम्ही भारतासोबत चांगली भागीदारी करू शकतो. भारत आणि चीनमध्ये हिमालयीन भागातील सीमेवरून सातत्याने विवाद झालेले आहेत. गेल्या वर्षी भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या पठारावर विवाद झाला होता. चीनने या पठारावर रस्ता बांधण्याचा घाट घातल्याने वादाला तोंड फुटले होते. अखेर 73 दिवसांच्या गतिरोधानंतर हा वाद संपुष्टात आला होता.  

टॅग्स :DoklamडोकलामIndiaभारतchinaचीनUnited Statesअमेरिका