शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

 दहशतवादाच्या मुद्यावर चीनने पुन्हा दिला पाकिस्तानला पाठिंबा, दहशतवादविरोधी अभियानासाठी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2017 7:33 PM

नुकत्याच आटोपलेल्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादाच्या मुद्यावर भारताच्या दबावामुळे पाकिस्ताची कोंडी करण्यात आली होती. मात्र त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच चिनने दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला असून, दहशतवादविरोधी अभियानासाठी पाकिस्तानचे कौतुक केले आहे.

बीजिंग, दि. 8 - नुकत्याच आटोपलेल्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादाच्या मुद्यावर भारताच्या दबावामुळे पाकिस्ताची कोंडी करण्यात आली होती. मात्र त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच चिनने दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला असून, दहशतवादविरोधी अभियानासाठी पाकिस्तानचे कौतुक केले आहे. त्याबरोबरच चीन आणि पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या नव्या अफगाणिस्तान धोरणावरही टीका केली आहे.  चीनने पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या लढ्याचे समर्थन केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर दहशतवादाला आश्रय देण्याचा आरोप केल्यानंतर चीनने हे वक्तव्य केले आहे. चीनने परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले, "पाकिस्तानची जनता आणि सरकारने दहशतवादाशी लढण्यासाठी मोठा त्याग केला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने हे समजून घेतले पाहिजे. दहशतवादाविरोधातील या लढ्याचे पूर्ण श्रेय पाकिस्तानला जाते." वांग यी आणि पाकिस्तानने परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे वक्तव्य समोर आले आहे. आसिफ सध्या चीनच्या दौऱ्यावर असून, अमेरिका आणि पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा चीन दौरा झाला आहे.  चीन आणि पाकिस्तानमधील या बैठकीत ट्रम्प यांच्या नव्या अफगाणिस्तान धोरणावरही जोरदार टीका करण्यात आली आहे. दोन्ही देशांनी तालिबानसोबत नव्याने चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून तेथे 16 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येईल.   चीनमध्ये झालेल्या ब्रिक्स परिषदेत भारताने दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानची कोंडी केली होती. त्यामुळे दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आले होते,  अतिरेकी कारवाया घडवून आणणारे, कट कारस्थान करणारे आणि सहकार्य करणाºयांना जबाबदार ठरविले पाहिजे, असा सूर या संमेलनातून उमटला. या दोन संघटनांसह अन्य अतिरेकी संघटनांवर कारवाईची मागणी ब्रिक्स देशांनी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, ब्राझिलचे राष्ट्रपती माइकल टेमर आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती जैकब जुमा यांनी या अतिरेकी कारवायांचा कठोर शब्दांत निषेध केला होता. ब्रिक्स परिषदेत मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उचलून धरला. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांसह तालिबान, इसिस आणि अल कायदा यांच्याविरुद्ध निर्णायक कारवाई करण्याची मागणी ब्रिक्स देशांनी केली. हक्कानी नेटवर्क, तसेच शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यावर अंकुश आणला जावा, अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करणे, अतिरेक्यांकडून इंटरनेट, सोशल मीडियाच्या होणाºया वापरावर प्रतिबंध आणणे, यांचाही घोषणापत्रात समावेश आहे. 

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादIndiaभारत