शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चीनचे राष्ट्राध्यक्ष Xi Jinping नजरकैदेत? सोशल मीडियावर चर्चा, पाहा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 09:19 IST

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग (Xi Jinping) यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग (Xi Jinping) यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. सोशल मीडियावरील अनेक पोस्टनुसार, क्षी जिनपिंग यांना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) प्रमुख पदावरून हटवण्यात आले असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचेही म्हटले जात आहे. तथापि, चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी किंवा स्थानिक माध्यमांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

क्षी जिनपिंग नुकतेच उझबेकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. येथे त्यांनी अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी संवाद साधला. यादरम्यान, २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यातील सीमेवर झालेल्या चकमकीनंतर ते प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी समोरासमोर आले. शनिवारी अनेक ट्विटर युझर्सने जिनपिंग यांच्या कथित नजरकैदेबद्दल काही पोस्ट केल्या होत्या. हा लष्करी उठाव आहे आणि पीएलएची वाहने आधीच राजधानी बीजिंगकडे जात आहेत, असाही दावा काही जणांनी केला होता.

बीजिंगला जाणार्‍या लष्करी वाहनांचा हा व्हिडिओ देशाने ५९ टक्के उड्डाणे ग्राउंडींग केल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना तुरुंगात पाठवल्यानंतर लगेचच समोर आला आहे. या ठिकाणी खूप गोंधळ आहे, याचा अर्थ सीपीपीमध्ये काहीतरी घडत आहे. चीन अस्थिर आहे," असे ट्वीट एका व्यक्तीने केले. काही चिनी तज्ज्ञांचा दावा आहे की सोशल मीडियावर चर्चा करण्यापलीकडे आतापर्यंत सत्तापालट होण्याची चिन्हे नाहीत. उझबेकिस्तानहून परतल्यानंतर जिनपिंग यांना क्वारंटाईन केले जाऊ शकते, असे चिनी तज्ज्ञ आदिल ब्रार यांनी सांगितले. तर दुसरीकडे चीनने या आठवड्याच्या सुरुवातीला दोन माजी मंत्र्यांना फाशीची शिक्षा सुनावली. जन्मठेपेची शिक्षा झालेले दोन मंत्री आणि इतर चार अधिकारी हे एका 'राजकीय गटातील' भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Xi Jinpingशी जिनपिंगchinaचीनTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया