शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

3 तासांचं अंतर 30 मिनिटांत; जगातील सर्वाधिक लांबीच्या सागरी पुलाचं लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 10:40 AM

पुलाच्या उभारणीसाठी तब्बल 20 अब्ज डॉलर्सचा खर्च

नवी दिल्ली: चीनच्या जुहाई शहराला हाँगकाँग आणि मकाऊला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. समुद्रात उभारण्यात आलेला हा जगातील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. 20 अब्ज डॉलर (दीड लाख कोटी रुपये) खर्चून उभारण्यात आलेला हा पूल 55 किलोमीटर लांबीचा आहे. या पुलाचं काम 2009 मध्ये सुरू झालं होतं. पर्ल रिव्हर एस्चुरीच्या लिंगदिंग्यांग प्रांतात या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. जगातील सर्वाधिक लांबीच्या पुलाच्या उभारणीसाठी तब्बल चार लाख टन स्टीलचा वापर करण्यात आला. इतक्या स्टीलचा वापर करुन 60 आयफेल टॉवर उभारले जाऊ शकतात. या पुलाच्या खाली असलेल्या समुद्रात 6.7 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आला आहे. हा बोगदा दोन कृत्रिम बेटांना जोडतो. यामुळे हाँगकाँग ते जुहाई दरम्यानचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांवर येणार आहे. याआधी या प्रवासासाठी 3 तासांचा अवधी लागायचा. समुद्रात उभारण्यात आलेला हा पूल हाँगकाँग आणि मकाऊसह दक्षिण चीनमधील 11 शहरांना जोडतो. या भागात 6.8 कोटी लोकांचं वास्तव्य आहे. हा पूल 120 वर्षे वापरला जाऊ शकतो. या पुलामुळे व्यापार वाढणार आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा चीनच्या अर्थव्यवस्थेला होईल. या पुलाचा वापर करण्यासाठी हाँगकाँगमधील कार चालकांना विशेष परवाना आवश्यक असेल. या पुलावर पादचाऱ्यांना परवानगी नाही. या पुलाचं काम सुरू असताना घडलेल्या दुर्घटनेत सात मजुरांचा मृत्यू झाला होता, तर 129 जण जखमी झाले होते.  

टॅग्स :chinaचीन