चीन बनतोय जगासाठी धोका, भारतालाच सर्वाधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 06:35 IST2022-12-01T06:34:26+5:302022-12-01T06:35:14+5:30
चीनची धोरणे जगासाठी अतिशय घातक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

चीन बनतोय जगासाठी धोका, भारतालाच सर्वाधिक
नवी दिल्ली : चीन आपले लष्करी सामर्थ्य प्रचंड वेगाने वाढवीत असून, हीच गती कायम राहिल्यास या देशाकडे २०३५ पर्यंत १५०० अण्वस्त्रे असतील हे चिंताजनक आहे, असा दावा अमेरिकेच्या पेंटॅगानने केला आहे. सध्या चीनकडे ३५०हून अधिक अण्वस्त्रे आहेत. २०२१मध्ये चीनने जगातील सर्वाधिक १३५ क्षेपणास्त्र चाचण्याही केल्या. सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला चीन आपल्या लष्कराला सामर्थ्यशाली करण्यासाठी अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनची धोरणे जगासाठी अतिशय घातक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
भारताला चीनचा सर्वाधिक धोका
nआशिया खंडामध्ये चीनला भारताकडून सर्वांत मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अर्थव्यवस्थेबाबत जपान आघाडीवर आहे.
nमात्र, कोणत्याही महाशक्तीच्या पाठिंब्याशिवाय भारत अनेक क्षेत्रांत प्रगती करीत आहे. भारताच्या प्रत्येक गोष्टीत ‘खो’ घालण्याचे धोरण चीनने अवलंबिले आहे.