चीनने अमेरिकेवर लादला ३४ टक्के कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 07:10 IST2025-04-05T07:09:33+5:302025-04-05T07:10:05+5:30
China Vs America: अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला.

चीनने अमेरिकेवर लादला ३४ टक्के कर
बीजिंग/नवी दिल्ली - अमेरिकेच्या समतुल्य आयात कराला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या वस्तूंवर १० एप्रिलपासून ३४ टक्के आयात कर लावण्याचा निर्णय शुक्रवारी घोषित केला. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनवर ३४ टक्के आयात कर लावला आहे. चीनच्या प्रतिकारवाईनंतर दोन्ही देशांत करयुद्धाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे.
भारतावरील कर २७ वरून २६ टक्के
भारतावर लावण्यात आलेला समतुल्य आयात कर अमेरिकेने २७ टक्क्यांवरून २६% केला आहे. व्हॉइट हाउसच्या दस्तावेजात ही माहिती देण्यात आली आहे. ९ एप्रिलपासून या कराची अंमलबजावणी होणार आहे. टॅरिफ वॉरच्या फटक्यामुळे सुवर्ण बाजारही अस्थिर झाला आहे.