चीननेही दिला आता ‘आत्मनिर्भरते’चा नारा; देशांतर्गत बाजारपेठ करणार मजबूत, पंचवार्षिक योजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:20 IST2025-10-24T07:20:21+5:302025-10-24T07:20:21+5:30
जिनपिंग यांची पक्ष व लष्करावर पुन्हा पकड

चीननेही दिला आता ‘आत्मनिर्भरते’चा नारा; देशांतर्गत बाजारपेठ करणार मजबूत, पंचवार्षिक योजना
बीजिंग : येत्या पाच वर्षांत विज्ञान व तंत्रज्ञानात संपूर्ण आत्मनिर्भरता आणण्याबरोबर चीनला सामर्थ्यवान देश करण्यावर चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे एकमत झाले आहे. पक्षाच्या चार दिवस चाललेल्या बैठकीत २०२६-२०३० अशी पंचवार्षिक योजना मांडण्यात आली. या योजनेत चीनची अंतर्गत बाजारपेठ अधिक मजबूत करणे, नव्या गुणवत्ता उत्पादक शक्तींच्या विकासाला दिशा देणे व समाजवादी बाजारपेठ अधिक विकसित करणे यावर भर देण्यात आला. चीनच्या समाजवादी विचारांच्या बैठकीसोबत शी जिनपिंग यांचीही विचारसरणी चीनच्या प्रगतीमध्ये आणण्याबाबत पक्ष सहमत झाला आहे.
माओनंतरचे शक्तिशाली नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाकडून शी जिनपिंग (७२) यांची पक्षाच्या आणि लष्कराच्या नेतृत्वासाठी तिसऱ्यांदा निवड झाल्याने ते माओनंतरचे सर्वांत शक्तिशाली नेते झाले आहेत.
पंचवार्षिक उद्दिष्ट्ये
विज्ञान आणि तंत्रज्ञानात अधिक आत्मनिर्भरता आणि सामर्थ्य प्राप्त करणे.
देशांतर्गत बाजारपेठ मजबूत करणे, त्यासाठी विकासाच्या नव्या प्रतिमानाला चालना देणे.
उच्च गुणवत्तेच्या विकासाला गती देणे, परस्पर सहकार्यातून नवीन क्षितिजे निर्माण करणे.
कृषी व ग्रामीण आधुनिकीकरणाला गती देणे व सर्वांगीण ग्रामीण पुनरुज्जीवन साधण्यासाठी ठोस पावले उचलणे.
‘ब्युटिफूल’ चीनची घोषणा.