शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 10:15 IST

भारत आणि चीन सैन्यात लडाखमध्ये झटापट झाल्यानंतर नेपाळ सरकारकडून महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध

काठमांडू: चीनच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानं भारताच्या जमिनीवर दावा सांगणाऱ्या नेपाळला आता वेगळीच भीती सतावू लागली आहे. भारतापासून दूर गेलेल्या नेपाळला आता चीनच्या विस्तारवादाचा फटका बसू लागला आहे. तिबेटमधील रस्ते निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून चीन नेपाळमधील जागा बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. चीन भविष्यात सीमेवर सैन्य चौक्या उभारेल, अशी भीती नेपाळ सरकारनं अहवालातून व्यक्त केली आहे. भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमधील गलवानमध्ये हिंसक झटापट झाल्यानंतर नेपाळ सरकारनं अहवाल प्रसिद्ध केला. नेपाळी कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण विभागानं ११ जागांची यादी तयार केली होती. यातल्या ११ जागांवर चीननं अतिक्रमण केलं आहे. या भागाचं एकूण क्षेत्रफळ ३३ हेक्टर्स इतकं आहे. अधिक भूभाग बळकवण्यासाठी चीनकडून नद्यांचे प्रवाह बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही नेपाळ सरकारनं अहवालात नमूद केलं आहे. हुमला जिल्ह्यातील बगदारे खोला आणि कर्नाली नदीच्या पात्रात बदल करून चीननं १० हेक्टर जमीन बळकावली आहे. तर रासुवा जिल्ह्यातील सहा हेक्टर जागादेखील चीननं ताब्यात घेतली आहे. चीननं तिबेट स्वायत्त प्रदेशातील (टीएआर) रस्त्यांचं जाळं विस्तारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नेपाळच्या दिशेनं वाहणाऱ्या नद्यांचे प्रवाह बदलले आहेत. त्यामुळे नेपाळची जमीन कमी होऊ लागली आहे. चीनकडून तिबेट स्वायत्त प्रदेशातील सुरू असलेली रस्त्यांची कामं अशाच प्रकारे सुरू राहिल्यास नेपाळचा भूभाग आणखी कमी होईल, अशी भीती अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. 'नदीचे प्रवाह अशाच प्रकारे बदलत राहिले, तर शेकडो हेक्टर जमीन तिबेट स्वायत्त प्रदेशात जाईल. भविष्यात या ठिकाणी चीन सीमा निगराणी चौक्या (बीओपी) उभारेल. तिथे सैन्य तैनात करण्यात येईल', असा धोका नेपाळ सरकारनं अहवालातून व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात भारत आणि चीन सैन्यात गलवानमध्ये हिंसक झटापट झाली. त्यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. या झटापटीत चीनचंही मोठं नुकसान झालं. या झटापटीनंतर लगेचच नेपाळ सरकारनं त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये १२ तास बैठक; भारतानं स्पष्ट शब्दांत सुनावलंनाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललंचीन युद्धाच्या तयारीत?; लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत हवाई दलाच्या हालचालीजुना मित्र कामी येणार; चीनला भिडणाऱ्या भारताला 'ब्रह्मास्त्र' देणार

टॅग्स :Nepalनेपाळchinaचीन