शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चीननं घेतला या वर्षातला सर्वात मोठा निर्णय! भारतच नव्हे, तर संपूर्ण जगावर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 18:12 IST

अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी चीननं मोठं पाऊल उचलंत रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोमध्ये (reserve requirement ratio)अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी चीननं मोठं पाऊल उचलंत रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोमध्ये (reserve requirement ratio)अर्ध्या टक्क्याची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चीनच्या बँकिंग व्यवस्थेमध्ये रोखरक्कम वाढणार आहे. त्यामुळे बँका कंपन्या किंवा ग्राहकांना जास्त कर्ज देऊ शकणार आहेत. यातून कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकेल. कंपन्यांना आपलं आर्थिक उप्तन्न वाढविण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मतानुसार चीनच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्यास याचा केवळ चीनलाच नव्हे, भारतासोबतच संपूर्ण जगाला याचा फायदा होणार आहे. चीनच्या निर्णयामुळे बाजारात १ लाख कोटी यूआन इतका पैसा येईल आणि सोमवारी भारतीय शेअर बाजारात याचे परिणाम पाहायला मिळू शकतात. देशातील धातू उप्तादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. 

भारतातील सीआरआर प्रमाणेच चीनमध्ये रिझर्व्ह रिक्वायरमेंट रेशोची व्यवस्था असते. चीनची सर्वोच्च बँक असलेल्या 'सेंट्रल पीपल्स बँक ऑफ चायना'नं यात घट करुन बँकिंग व्यवस्थेत रोखरक्कम वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. चीननं रिझर्व्ह रेशोमध्ये ०.५ टक्क्यांची कपात केली आहे. नवे दर १५ जुलैपासून लागू होणार आहेत. प्रसार माध्यमांमधील माहितीनुसार चीनच्या या निर्णयामुळे बाजारात १ लाख कोटी यूआन इतकी रक्कम येणार आहे. याचा परिणाम आपल्याला शेअर बाजाराता पाहायला मिळू शकतो. 

भारतावर काय परिणाम होणार?चीन संपूर्ण जगात धातूचा सर्वात मोठा ग्राहक आहे. अशावेळी व्याजदरात कपात झाल्यानं धातूच्या दराला मोठा आधार मिळेल. यामुळे जगभरातील शेअर बाजाराला मोठी चालना मिळेल. अमेरिकी डॉलरवर दबाव वाढल्यानं भारतीय रुपयाला देखील आधार मिळेल. स्वस्त दरात चीनमधील कंपन्यांना कर्ज उपलब्ध होऊ शकेल. यामुळे उत्पादनात मोठी वाढ होईल आणि तांबं, झिंक, शिस्याची विक्री मोठ्या प्रमाणात वाढेल. अशावेळी भारतीय कंपन्या याचा मोठा फायदा घेऊ शकतात. दरम्यान, चीन आणि भारताची मॉनिटरी पॉलिसी जवळपास एकसारखीच आहे. चीननं ज्या ज्या वेळी व्याज दरात कपात केलीय. त्यानंतर भारतातही व्याज दरात कपातीचा निर्णय घेतला जातो. सध्या भारतात व्याज दरात कपातीची शक्यता खूपच कमी आहे. कारण भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. 

अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार यांचं एकमेकांशी नातं आहे. त्यामुळेच काही देशांच्या अर्थव्यवस्थेत तेजी मिळाल्याचं दिसल्यानंतर शेअर बाजारातंही सुगीचे दिवस आल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतBanking Sectorबँकिंग क्षेत्र