चीननं बनवली जगातील सर्वात खतरनाक पाणबुडी, भारताला घाम फोडणार
By Admin | Updated: June 25, 2017 14:42 IST2017-06-25T14:42:07+5:302017-06-25T14:42:07+5:30
जगभरात शस्त्रास्त्र स्पर्धेत नंबर वन बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीननं एक नवं शस्त्र बनवलं आहे.

चीननं बनवली जगातील सर्वात खतरनाक पाणबुडी, भारताला घाम फोडणार
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 25 - जगभरात शस्त्रास्त्र स्पर्धेत नंबर वन बनण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीननं एक नवं शस्त्र बनवलं आहे. चीननं पाण्याच्या खालून शत्रूंना लक्ष्य करणारी एक जबरदस्त पाणबुडी बनवली आहे. चीननं बनवलेली पाणबुडी ही जगातील सर्वात भयंकर आणि शक्तिशाली पाणबुडी असल्याचा दावा चीनच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही पाणबुडी शांघाईमध्ये बनवण्यात आली असून, याची माहिती चीनची सर्वात मोठी संशोधन संस्था चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सनं दिली आहे. संशोधकांच्या मते, "सुपर कंडक्टिव्ह मॅग्नेटिक एनोमली डिटेक्शन एरे" हे या पाणबुडीचं नाव आहे. ही पाणबुडी समुद्रातील खनिजांचा शोध घेण्यासोबतच दुस-या पाणबुडीला शोधून काढण्यास सक्षम आहे. या पाणबुडीतील रिअॅक्टर हवेत राहून खनिजांची योग्य जागा दाखवण्यासाठी समर्थ आहेत. चीन या पाणबुडीचा उपयोग नागरिक किंवा लढाऊ विमानांना लक्ष्य करण्यासाठी करू शकतो.
हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, चिनी लष्कर लवकरच या पाणबुडीला स्वतःच्या सैन्यदलात सामील करून घेणार आहे. या पाणबुडीत चीनच्या जुन्या पाणबुडीपेक्षा वेगळं डिव्हाइज बसवण्यात आलं आहे. नव्या पाणबुडीमध्ये वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान हे अत्याधुनिक आहे, तेच त्या पाणबुडीचं यश आहे, अशी माहिती चीनचे वैज्ञानिक डॉ. ली चाँग यांनी दिली आहे.