शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

CoronaVirus News : लॉकडाऊनचा फटका! चीनमध्ये कंपनीने ऑफिसमध्ये 20,000 कर्मचाऱ्यांच्या राहण्याची केली सोय कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:35 IST

CoronaVirus News : कोरोनाच्या या नव्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अर्थव्यस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यास हातभार लावण्यासाठी अनेक ठिकाणी कंपन्यांमध्येच कर्मचारी राहत असल्याचं चित्र दिसत आहे. 

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. संपूर्ण युरोपसहीत चीनमध्येही कोरोना पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटमुळे चीनमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत आर्थिक घडामोडींचं देशातील सर्वात महत्वाचं केंद्र असणाऱ्या शांघाईमध्येही सेमी लॉकडाऊन जारी करण्यात आला. कोरोनाच्या या नव्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अर्थव्यस्थेचा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यास हातभार लावण्यासाठी अनेक ठिकाणी कंपन्यांमध्येच कर्मचारी राहत असल्याचं चित्र दिसत आहे. 

चीनमधील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय केली आहे. शांघाईमधील लुजियाझुई येथे जवळवजळ 20 हजार कर्मचारी, बँकर्स आणि व्यापारी त्यांच्या कार्यालयांमध्येच वास्तव्यास आहे. कंपनीमध्ये दिवसभर काम करुन नंतर लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये बाहेर पडता येत नसल्याने या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय कंपन्यांनी कामाच्या जागीच करुन दिली आहे. हजारोंच्या संख्येने स्लीपिंग बॅग मागवण्यात आल्यात. या कर्मचाऱ्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी चीनमध्ये कोरोनाचे 4 हजार 477 रुग्ण आढळून आले होते. 

लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका चीनच्या अर्थव्यवस्थेला हळूहळू बसू लागला आहे. शांघाईमधील पुडाँग हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवार ते शुक्रवार लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंबंधी माहिती दिली आहे. नागरिकांना घरातच थांबावं लागणार असून इतरांशी संपर्क होऊ नये यासाठी सामान चेक पॉइंटवर ठेवलं जाणार आहे. अत्यावश्यक नसणारी कार्यालयं आणि सर्व व्यवसाय बंद राहतील. तसंच सार्वजनिक वाहतूक बंद केली जाणार आहे, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोना संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी शांघाई शहरातील काही भागात सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. 26 मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरातील अनेक सेक्टर हे बंद करण्यात आले आहेत. जागोजागी बूथ तयार करण्यात आले असून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे शांघाईच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच कोरोनामुळे शांघाईचं डिजनी थीम पार्क आधीपासूनच बंद आहे. शांघाईसह चीनच्या उत्तर पूर्वेत असेलल्या जिलिन प्रांतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, 'कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात यावीत आणि आवश्यकता असेल त्या परिसरात ताबोडतोब लॉकडाऊन करावे.' 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन