शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

China Coronavirus : 'कोरोना'चा कहर! जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 10:20 IST

China Coronavirus: कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला आहे.

ठळक मुद्देशेअर बाजार घसरल्यामुळे जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान.अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांना तोटा.डाऊ जोन्सचा औद्योगिक सरासरी निर्देशांक 12 टक्क्यांनी घसरला आहे.

बीजिंग - चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. जगभरात आतापर्यंत 2800 लोकांचा मृत्यू झाला असून 83 हजार लोकांना संसर्ग झाला आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.कोरोना व्हायरसने आता जगालाच आपल्या कवेत घेण्यास प्रारंभ केल्याने जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीने आशियातील सर्वच शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण झाली. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला आहे. शेअर बाजार घसरल्यामुळे गेल्या काही दिवसांत जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील अ‍ॅमेझॉनचे जेफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग आणि एसव्हीएमएचचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना तोटा झाला आहे. शेअर मार्केट डाऊ जोन्सचा औद्योगिक सरासरी निर्देशांक 12 टक्क्यांनी घसरला आहे. 2008 आर्थिक संकटानंतर अशी स्थिती पहिल्यांदाच दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 'ब्लूमबर्ग' च्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जेफ बेजोस

शेअर बाजारातील घसरणीचा जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक अ‍ॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांना फटका बसला आहे. जेफ बेजोस यांच्या मालमत्तेत 11.9 अब्ज डॉलर्सची घसरण झाली.

बिल गेट्स 

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांच्या मालमत्तेत 10 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. 

बर्नाड अरनॉल्ट 

बर्नाड अरनॉल्ट यांच्या संपत्तीत 9.1 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

एलन मस्क

एलन मस्क यांची मालमत्ता 9 अब्ज डॉलर्सनी कमी झाली.

वॉरेन बफे 

वॉरेन बफे यांना मोठे नुकसान सहन करावं लागलं. बफे यांच्या मालमत्तेत 8.8 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे.

मार्क झुकेरबर्ग 

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना देखील फटका बसला आहे. झुकेरबर्ग यांची मालमत्ता 6.6 अब्ज डॉलर्सने कमी झाली.

'कोरोना'मुळे अंबानी, अदानी झाले 'गरीब'; बघा, किती कोटींनी घटली संपत्ती

देशातील आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक/ व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींना 5 बिलियन्स डॉलर म्हणजे 5 अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. यंदाच्या वर्षात त्यांच्या संपत्तीत एवढी मोठी घट झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनाही 884 दशलक्ष डॉलरचे नुकसान सहन करावे लागणार आहे. तसेच, आयटी क्षेत्रातील नामवंत अझीम प्रेमजी यांच्या संपत्तीतही 869 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. तर, अदानी यांनाही केवळ 2 महिन्यात 496 दशलक्ष डॉलरचा फटका बसला आहे.  

उदय कोटक आणि सन फार्माचे दिलीप संघवी यांनाही मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. विशेष म्हणजे या सर्वच उद्योजकांना गेल्या 15 दिवसांतच सर्वाधिक आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक जवळपास 3000 अंकांनी कमी झाला आहे. 12 फेब्रवारीपासून होत असलेली निर्देशांकांची घसरण अद्यापही सुरुच आहे. शेअर बाजारातील दलालांनाही कोरोना व्हायरसमुळे नुकसान झाले आहे. गुंतवणुकदारांच्या खिशातील 11.52 लाख कोटी रुपयांची संपत्ती गायब झाली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा

"अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठी घटना सार्वजनिक दृष्टिपथात होणे आवश्यक"

दीड लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून जमा होणार पैसे

मेलानिया यांच्या ट्विटमुळे ‘हॅप्पीनेस क्लास’ जगभरात; केजरीवाल सरकारच्या उपक्रमाचे कौतुक

 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनEconomyअर्थव्यवस्थाamazonअ‍ॅमेझॉनFacebookफेसबुकMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग