शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 09:24 IST

माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते.

ठळक मुद्देगलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात - चीन15 जूनच्या रात्री भारतीय सैनिकांनीच करार तोडून एलएसी ओलांडली आणि चिनी सैनिकांवर हल्ला केला - चीनचिनने गलवान खोऱ्यावर दावा करण्याच्या एक दिवस आधीच भारताने गलवान घाटीवरील चिनी सेन्याच्या सार्वभौमत्वाचा दावा फेटाळून लावला होता.

पेइचिंग :चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दावा केला, की गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (एलएसी) चिनी हद्दीत येते. एवढेच नाही, तर 15 जूनच्या रात्री भारतीय सैनिकांनीच करार तोडून एलएसी ओलांडली आणि चिनी सैनिकांवर हल्ला केला.

चिनने गलवान खोऱ्यावर दावा करण्याच्या एक दिवस आधीच भारताने गलवान घाटीवरील चिनी सेन्याच्या सार्वभौमत्वाचा दावा फेटाळून लावला होता. तसेच आपल्या हालचाली एलएसीच्या आतच ठेवा, असे सांगितले होते. गलवान खोऱ्यातील चीनचा दावा भारताने आधिच फेटाळून लावला आहे. भारताने म्हटले आहे, की अशा प्रकारचा खोटा दावा करणे, 6 जूनला झालेल्या उच्च स्तरीय सैन्य बैठकीत झालेल्या सहमतीविरोधात आहे.

India and china standoff : चीनच्या अगदी जवळ जाऊन पोहोचली भारताची लढाऊ विमानं, IAF प्रमुखांनी केली पाहणी

चीन म्हणतोय गलवान खोरे आमचा भाग -माध्यमांशी संवाद साधताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी 15 जूनला झालेल्या हिंसक चकमकीसाठी पुन्हा एकदा भारतालाच जबाबदार धरले आहे. ते म्हणाले 'गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनी भागात येते. अनेक वर्षांपासून तेथे चीनी सैनिक गस्त घालत आहेत.

India and china standoff : 'ते अडीच हजार अन् आम्ही फक्त 300...', जखमी जवानाने वडिलांना सांगितला 'त्या' रात्रीचा थरार

भारताने करार तोडला -चीनने दावा केला, की सोमवारी रात्री भारतीय सैनिक करार तोडून चीनच्या सीमेत घुसले आणि त्यांनी त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलेल्या चिनी अधिकाऱ्यांवर आणि सैनिकांवर हल्ला केला. यानंतर तेथे हिंसक चकमक उडाली आणि सैन्याचे मोठे नुकसान झाले. भारतीय सेनिकांनी दोन्ही देशांतील कराराचे, तसेच आंतरराष्ट्रीय संबंध नियंत्रित करणाऱ्या मुलभूत मानदंडांचे उल्लंघन केले आहे.

गलवानमधील विश्वासघातकी कृत्यानंतर, आता चीन दाखवतोय 'या' महाविनाशक बॉम्बची भीती; पाहा VIDEO 

लवकरात लवकर बोलणी व्हावी -चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवरील एका प्रेस नोटमध्ये झाओ यांनी म्हटले आहे, या भागातील परिस्थितीवर मात करण्यासाठी लवकरात लवकर कमांडर स्तरावरील दुसरी बैठक व्हायला हवी. भारत आणि चिनी राजदूत तसेच सैन्य तणाव कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करत आहेत.

पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले आहेत 'आमने-सामने'

गेल्या 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्याजवळ भारतीय जवान आणि चीनी सैनिकांत चकमक झाली. यामुळे सीमेवरील तणाव  अधिक वाढला आहे. गेल्या महिनाभरापासून लडाखच्या अनेक भागांत चीन आणि भारताचे सैन्य समोरासमोर आहे. चर्चेनंतरही चीन दिलेला शब्द पाळायला तयार नाही. त्यांनी भारतीय सैनिकांनाही धोका दिला आहे. चर्चा सुरू असतानाही चीन सीमेवर सैनिक आणि शस्त्रांचा साठा वाढवतच होता. 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाchinaचीनladakhलडाखSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान