शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Video: बहुमजली इमारतीला भीषण आग; अनेक मजले जळून खाक, चीनमधील धक्कादायक घटना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 17:07 IST

चीनमधील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमच्या इमारतीला ही आग लागली आहे.

शांघाई:चीनच्या चांगशा शहरात एका सरकारी कंपनीच्या बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चीनच्या सरकारी मीडियाने ही माहिती दिली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. बहुमजली इमारतीतील अनेक मजल्यांमध्ये ही भीषण आग लागली असून, यात मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्हिडिओत इमारतीतून आगीचे लोट निघत असल्याचे दिसत आहे. ही घटना घडताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. इमारतीमध्ये किती लोक होते? या घटनेत किती नुकसान झाले? जीवितहानी झाली का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळू शकली नाहीत. सध्या मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीमध्ये अनेकांची घरे आणि कार्यालये आहेत. चीनमधील सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमची ही इमारत आहे. शहराच्या मध्यभागी इमारत असल्यामुळे संपूर्ण शहरातून ही आग दिसत आहे. स्थानिक माध्यमांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये धुरामुळे इमारत बाहेरून पूर्णपणे काळी पडल्याचे दिसत आहे. चांगशा ही हुनान प्रांताची राजधानी आहे, जिथे सुमारे 10 मिलीयन लोक राहतात. 

टॅग्स :chinaचीनBuilding Collapseइमारत दुर्घटनाfireआग