शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
2
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
3
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
4
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
5
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
6
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
7
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
8
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
9
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
10
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
11
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
12
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
13
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
14
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
15
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
16
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
17
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
18
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
19
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
20
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?

अमेरिकेनं भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीनचा जळफळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 5:06 PM

अमेरिकेनं चीनच्या वन बेल्ट वन रोड(ओबीओआर)या प्रकल्पावर टीका करत भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीननं आगपाखड केली आहे. अमेरिका दुजाभाव करत असल्याचं म्हणत चीननं अमेरिकेवरच निशाणा साधला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेनं चीनच्या वन बेल्ट वन रोड(ओबीओआर)या प्रकल्पावर टीका करत भारतावर स्तुतिसुमनं उधळल्यानं चीननं आगपाखड केली आहे. अमेरिका दुजाभाव करत असल्याचं म्हणत चीननं अमेरिकेवरच निशाणा साधला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिऊ कांग म्हणाले, अमेरिकेनं पक्षपाती भूमिका सोडून इतर देशांना समान वागणूक दिली पाहिजे. जेणेकरून चीन-अमेरिकेच्या संबंधात सकारात्मकता येईल.तत्पूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांनी भारत दौ-यावर असताना चीनच्या दक्षिण चीन समुद्रातील दाव्याला फटकारलं होतं. तसेच भारत हा आशियातला महत्त्वपूर्ण भागीदार असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं होतं. अनिश्चितता व चिंतेच्या या काळात जागतिक पातळीवर अमेरिकेचा भारत हा विश्वासार्ह मित्र आहे. तसेच चीनच्या विरोधात अमेरिका भारताला समर्थन देणार असल्याचंही टिलरसन यांनी स्पष्ट केलं होतं. चीनचा व्यवहार व त्यांची कारवाई आंतरराष्ट्रीय नियमांना आव्हान देत आहे. भारतासोबतच प्रगती करत असलेल्या चीननं जबाबदारीनं भूमिका निभावली पाहिजे. भारत इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करतो, असंही टिलरसन म्हणाले आहेत. भारत हा महत्त्वाचा भागीदार असल्याचं अमेरिकेनं सांगितल्यामुळे चीनचा जळफळाट झाला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त आयलंडनजीक अमेरिकेची युद्धनौका पाहून चीनच्या संतापाला पारावार उरला नव्हता. अमेरिकेनं चीनच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करावा, असं म्हणत अमेरिकेच्या या कृतीला चीननं विरोध दर्शवला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्र नाशक युद्धनौका चीन दावा सांगत असलेल्या द्विपाच्या जवळून गेली होती. या भागावरून चीनचा शेजारील देशांशी वाद सुरू आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, चीननं युद्धनौकेची ओळख पटवण्यासाठी स्वतःचं सैन्य जहाज तिथे पाठवलं आणि अमेरिकेच्या युद्धनौकेला तिथून जाण्याचा इशारा दिला होता. अमेरिकेच्या युद्धनौकेनं चीनचा कायदा व संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं आहे. तसेच चीनचं सार्वभौमत्व व सुरक्षेच्या हितांचंही उल्लंघन केलं आहे. चीननं कडक शब्दात याचा निषेध नोंदवल्याचंही चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिकेच्या नौदलानं चौथ्यांदा केलेलं फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन ऑपरेशन(FNOP) आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीन