पाकमध्ये मोदींच्या फोटोला चपलेचा हार
By Admin | Updated: October 19, 2016 19:31 IST2016-10-19T18:06:09+5:302016-10-19T19:31:09+5:30
दोन्ही देशातील जनतेच्या मनात एकमेंकाबद्द राग आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी दुनिया न्युजच्या वृत्तानुसार पाकमध्ये एका हॉटेल मालकाने मोदी यांचा फोटो लावला आहे

पाकमध्ये मोदींच्या फोटोला चपलेचा हार
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १९ - उरी दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकमध्ये जाऊन केलेल्या सर्जिकल स्ट्रईक नंतर भारत-पाक संबंध विकोपाला गेले आहेत. पाकमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेमध्ये मोदींनी जाण्यास नकार दिला. त्यानंतर आशियातील इतर देशांनी ही दहशतवादाच्या मुद्यावर भारताला सहकार्य करत सार्क परिषदेमध्ये सहभागी होण्यास मनाई केली. त्यामुळे भारत - पाक संबंध अधिकच बिघडले.
दोन्ही देशातील जनतेच्या मनात एकमेंकाबद्दल राग आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी दुनिया न्युजच्या वृत्तानुसार पाकमध्ये एका हॉटेल मालकाने मोदी यांचा फोटो लावला आहे. त्या फोटोला चपला मारा आणि कोल्ड्रिंक्स मोफत मिळवा अशी ऑफरच त्याने ठेवली आहे. लोक येत आहेत आणि मोदींच्या फोटोला चपला मारत आहेत. एकाने तर त्यांच्या फोटोला चपलांचा हारच घातला आहे. त्यांच्या या कुकर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हॉटेल मालकाच्या या कृत्याचा सोशल मीडियावर नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेत संताप व्यक्त केला आहे.