रंग बदलून वीजनिर्मिती करणारी स्मार्ट काच
By Admin | Updated: April 13, 2015 04:33 IST2015-04-13T04:33:41+5:302015-04-13T04:33:41+5:30
संशोधकांनी नव्या प्रकारची काच विकसित केली असून, ही काच रंग बदलते व रंग बदलताना वीजनिर्मिती करते. या विजेवर स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो असा

रंग बदलून वीजनिर्मिती करणारी स्मार्ट काच
वॉशिंग्टन : संशोधकांनी नव्या प्रकारची काच विकसित केली असून, ही काच रंग बदलते व रंग बदलताना वीजनिर्मिती करते. या विजेवर स्मार्टफोन चार्ज होऊ शकतो असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. जॉर्जिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रकारच्या काचा पाऊस व वाऱ्यामुळे प्रभावित होतात. काचेचा हाच गुण लक्षात घेऊन ट्रायबोइलेक्ट्रिक्स नावाची काच तयार करण्यात आली आहे. या काचेचा एक थर पावसाच्या थेंबात सक्रिय होतो व वीजनिर्मिती करतो, तर दुसरा थर वाऱ्यामुळे प्रभावित होतो व वीजनिर्मिती करतो.
सुरुवातीला काच स्वच्छ असते; पण नंतर तिचा रंग निळा होतो. काचेच्या प्रतिचौरस मीटर अंतरात १३० मिलिवॅट इतकी वीज तयार होते. ही वीज स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी पुरेशी असते. अशी काच वायरलेस नेटवर्कवर परस्परांशी जोडली जाते. हा स्वतंत्र वीजनिर्मिती स्रोत नव्हे. (वृत्तसंस्था)