पृथ्वीवरील हा जीव चंद्रावरही करू शकतो वास्तव्य? भासत नाही ऑक्सिजनची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 19:59 IST2023-08-28T19:58:50+5:302023-08-28T19:59:17+5:30
Which creature can live on moon: सध्या चंद्र आणि चंद्रावरील जीवनाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मात्र चंद्रावर कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आहे. त्यामुळे ऑक्सिजनशिवाय तिथे श्वास घेणं कठीण आहे. मात्र पृथ्वीवरचा एक प्राणी चंद्रावर कुठल्याही अडथळ्याविना चंद्रावर आरामात राहू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का.

पृथ्वीवरील हा जीव चंद्रावरही करू शकतो वास्तव्य? भासत नाही ऑक्सिजनची गरज
कुठल्याही प्राण्याला जिवंत राहण्यासाठी पहिली अट ही आहे की कुठल्याही अडथळ्याविना श्वसन करता आलं पाहिजे. श्वास घेण्यासाठी वातावरण आणि त्यामध्ये ऑक्सिजन असणं आवश्यक आहे. सध्या चंद्र आणि चंद्रावरील जीवनाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मात्र चंद्रावर कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आहे. त्यामुळे ऑक्सिजनशिवाय तिथे श्वास घेणं कठीण आहे. मात्र पृथ्वीवरचा एक प्राणी चंद्रावर कुठल्याही अडथळ्याविना चंद्रावर आरामात राहू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का.
नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्समध्ये प्रकाशित संशोधन अहवालानुसार, अशा जीवाची ओळख आधीच पटवण्यात आली आहे. या जीवाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची अजिबात आवश्यकता भासत नाही. संशोधकांच्या मतानुसार केवळ आठ मिमी आकार असलेला पांढरा परजीवी हेनेगुया सालमिनिकोला हा असा एकमेव जीव आहे, जो श्वास घेताना ऑक्सिजनचा वापर करत नाही. हा पांढरा जीव चिनूक सेल्मसच्या मांसाला संक्रमित करतो. मात्र पांढरा परजीवी हेनेगुया सालमिनिकोला जगण्यासाठी आवश्यक असलेली उर्जा कुठून मिळवतो, याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही.
विज्ञान सांगतं की बहुपेशीय जीव उर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. ही प्रक्रिया मायटोकॉन्ड्रियामध्ये पूर्ण होते. न्यू सायंटिस्टच्या रिपोर्टनुसार या प्रक्रियेसाठी हेनेगुया सालमिनिकोलाजवळ स्वत:चे जीन आहेत. जेव्हा शास्त्रज्ञांनी परजीवीमध्ये त्या जीनचा शोध घेतला तेव्हा ते पूर्णपणे गायब झालेले होते. हेनेगुया सालमिनिकोलाने श्वास घेण्यासाठी आवश्यक जीन का गमावले, याचं उत्तर संशोधक अद्याप शोधू शकलेले नाहीत. मात्र शास्त्रज्ञांच्या मते तो ज्या जीवाच्या आधारे जगतो त्याच्याकडून त्याला उर्जा मिळत असावी. हेनेगुया सालमिनिकोला हा सेलमन मासळीमध्ये सापडणारा परजीवी आहे. तो ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकतो.