झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना पायउतार करून अध्यक्षपदी म्नानगावा यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:36 AM2017-11-20T04:36:56+5:302017-11-20T04:37:22+5:30

हरारे : झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना सत्ताधारी झेएएनयू-पीएफ पक्षाने रविवारी पदावरून दूर करून त्यांच्या जागी उपाध्यक्ष एमर्सन म्नानगावा यांची नियुक्ती केली

Chairman of Zimbabwe's deputy Robert Mugabe has stepped down as Mananagawa's president | झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना पायउतार करून अध्यक्षपदी म्नानगावा यांची नियुक्ती

झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना पायउतार करून अध्यक्षपदी म्नानगावा यांची नियुक्ती

googlenewsNext

हरारे : झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना सत्ताधारी झेएएनयू-पीएफ पक्षाने रविवारी पदावरून दूर करून त्यांच्या जागी उपाध्यक्ष एमर्सन म्नानगावा यांची नियुक्ती केली, असे पक्षाने सांगितले. मुगाबे यांना पदावरून दूर करण्याचा आणि उपाध्यक्षांना अध्यक्ष करण्याचा ठराव संमत करण्यात आला, असे पक्षाने अधिक तपशील न देता सांगितले.
तत्पूर्वी, हरारे यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी लाखो नागरिक राजधानी हरारेत जमले होते. दोन आठवड्यांपूर्वी उपाध्यक्षांची मुगाबे यांनी हकालपट्टी केली होती व त्यानंतरच लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली. मुगाबे जर पदावरून स्वत:हून दूर झाले नाहीत, तर त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया सुरू होणार होती. लष्कराने बंड केल्याचे आरोप होऊ नयेत व मुगाबे यांनी पदावरून दूर व्हावे यासाठी लष्कराचे कमांडर कॉन्स्टंटिनो चिवेंगा यांनी मुगाबे यांच्याशी चर्चा केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Chairman of Zimbabwe's deputy Robert Mugabe has stepped down as Mananagawa's president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.