कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो येणार भारत दौ-यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 08:49 AM2018-02-13T08:49:20+5:302018-02-13T09:06:54+5:30

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध वेगाने वृद्धींगत होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी अशा आठवड्याभराच्या दौ-यावर भारतात येत आहेत.

Canada's Prime Minister Justin Trudeau will visit India | कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो येणार भारत दौ-यावर 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो येणार भारत दौ-यावर 

Next

टोरंटो - भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध वेगाने वृद्धींगत होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी अशा आठवड्याभराच्या दौ-यावर भारतात येत आहेत. या दौ-यादरम्यान ते नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, आग्रा, अमृतसर या शहरांना भेट देतील. जस्टीन ट्रुडो हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचे पुत्र. त्यामुळे राजकारणाची आणि लिबरल पक्षाच्या धोरणांची माहिती त्यांना लहानपणापासूनच मिळत होती.

त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांची आई मार्गारेट आणि वडील पिएरे विभक्त झाले. त्यानंतर कॅनडाच्या मॅकगील विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते फ्रेंच आणि गणित शिकविण्याचे काम केले होते .

बॉक्सर, अॅक्टर पंतप्रधान 

बॉक्सिंग करणारे, शाळेत शिकवणारे जस्टीन हे खरंंच आगळावेगळे पंतप्रधान आहेत. जस्टीन  तरुणांच्या चर्चामधे विविध कारणांनी येत आहेत. त्यांचे कपडे, हेअरस्टाईल इथपासून त्यांच्या विविध मतांर्पयत माध्यमांसकट सर्वत्र चर्चा होत आहे. टॅटू असणारे ते जगातले पहिलेच पंतप्रधान असावेत.

त्यांच्याबाबत सांगण्याजोगी आणखी एक वेगळेपणाची बाब म्हणजे पहिल्या महायुद्धावर आधारित 'द ग्रेट वॉर' या सिनेमातही त्यांनी काम केले आहे. भारत भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ते विविध विषयांवर चर्चा करतील अशी अपेक्षा भारत व कँनडाच्या माध्यमांत व्यक्त होत आहे.

Web Title: Canada's Prime Minister Justin Trudeau will visit India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.