शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

OMG! पोटाऐवजी महिलेच्या लिव्हरमध्ये आढळलं भ्रूण, अल्ट्रासाउंड रिपोर्ट बघून डॉक्टरची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 18:18 IST

Canada Pregnancy Rare case : एक प्रेग्नेंट महिला जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्यासमोर एका विचित्र (Pregnancy Rare case) स्थितीचा खुलासा करण्यात आला.

आई होणं ही कोणत्याही महिलेसाठी सर्वात आनंदाची बाब असते. बाळाच्या जन्मानंतर महिलेच्या केवळ आयुष्यातच नाही तर शरीरातही बदल होतो. असं असूनही महिला त्यांची प्रेग्नन्सी एन्जॉय करतात. पण प्रत्येकजण नशीबवान नसतं. जगात अनेक महिलांना त्यांच्या प्रेग्नेन्सीत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशीच एक विचित्र प्रेग्नेन्सी केस कॅनडात (Canada) समोर आली आहे. इथे एक प्रेग्नेंट महिला जेव्हा डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्यासमोर एका विचित्र (Pregnancy Rare case) स्थितीचा खुलासा करण्यात आला.

कॅनेडिअन पेडिअट्रिशन डॉ. मायकल यांनी या केसची माहिती त्यांच्या टिकटॉक अकाऊंटवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली. डॉ. मायकल म्हणाले की, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये अनेक प्रकारच्या केसेस पाहिल्या, पण अशी केस कधीच पाहिली नाही. डॉक्टर मायकल यांच्याकडे ३३ वर्षीय महिला आपल्या उपचारासाठी आली होती. महिलेची पाळी १४ दिवस राहत होती आणि गेल्या दीड महिन्यांपासून तिला पाळी येत नव्हती. त्यामुळे ती डॉक्टरकडे प्रेग्नेन्सी कन्फर्म करण्यासाठी गेली होती.

डॉक्टरला पूर्ण विश्वास होता की, महिला प्रेग्नेंट आहे. फक्त कन्फर्म करण्यासाठी डॉक्टरने महिलेचा अल्टासाउंड केला. या अल्ट्रासाउंड रिपोर्टने डॉक्टरसह महिलेलाही हैराण केलं. महिला प्रेग्नेंट तर होती, पण तिचं बाळ गर्भ पिशवीत नव्हतं. संबंध ठेवल्यावर कसेतरी स्पर्म महिलेच्या लिव्हरमध्ये गेले होते. त्यामुळे भ्रूण महिलेच्या लिव्हरमध्ये वाढू लागलं होतं. डॉक्टरने सांगितलं की, महिलेच्या लिव्हरमध्ये एक्टोपिक प्रेग्नेन्सी आढळून आली आहे. एक्टोपिक प्रेग्नेन्सी तेव्हा होते जेव्हा एग फॅलोपियन ट्यूबमध्ये चुकीच्या दिशेने ट्रॅव्हल करू लागतात.  आणि त्यामुळे प्रेग्नेन्सी योग्यपणे होत नाही. 

हे पाहिल्यानंतर डॉक्टरने लगेच महिलेची सर्जरी केली. सर्जरी करून महिलेचा जीव वाचवण्यात आला. पण भ्रूण आधीच लिव्हरच्या आत मृत झालेलं होतं. अशात डॉक्टरांनी सर्जरी करून मृत भ्रूण बाहेर काढलं. इतिहासात डोकावून पाहिलं तर जर्नल ऑफ इमरजन्सीमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, २०१२ मध्ये एका महिलेच्या लिव्हरमधून १८ आठवड्यांचं भ्रूण अटॅच आढळलं होतं. या महिलेची सर्जरी करण्यात आली आणि यादरम्यान ब्लीडिंगमुळे महिलेचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :CanadaकॅनडाPregnancyप्रेग्नंसीJara hatkeजरा हटके