शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

"कॅनडा खुन्यांचा अड्डा बनतोय", दहशतवादाच्या मुद्द्यावर बांगलादेशने दिली भारताला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 12:24 IST

हत्येची कबुली दिलेल्या आरोपीचेही कॅनडा प्रत्यार्पण करत नसल्याचा बांगलादेशचा आरोप

India Canada Rift, Bangladesh: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडात सुरू असलेल्या वादात बांगलादेशने मोदी सरकारला उघडपणे पाठिंबा दिला आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन म्हणाले की, कॅनडा हा  अड्डा बनत चालला आहे. यापूर्वी भारताने असेही म्हटले होते की, कॅनडा आता दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जर हत्येसाठी भारताची गुप्तचर संस्था रॉला जबाबदार ठरवल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे.

बांगलादेशच्या मंत्र्याने सांगितले की कॅनडाने शेख मुजीबुर रहमानचा मारेकरी नूर चौधरीचे प्रत्यार्पण केलेले नाही. खुद्द नूर चौधरीने बांगलादेशच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याची कबुली दिली असूनही त्यांनी त्याचे प्रत्यार्पण केलेले नाही. मोमेन म्हणाले, "कॅनडा सर्व खुन्यांचे आश्रयस्थान बनू नये असे मला वाटते. सध्या तरी खुनी लोक कॅनडामध्ये जाऊन आश्रय घेऊ शकतात. ते तिथे मजेत राहतात. पण त्यांनी ज्यांचा खून केलाय, त्यांचे कुटुंबीय मात्र यातना भोगत, दुःखात जगत आहेत."

कॅनडाचा कायदा खुन्यांना मदत करणारा...

प्रत्यार्पणाबाबत कॅनडाच्या भूमिकेला जगातील इतर देशांमध्येही विरोध वाढत असल्याचे बांगलादेशी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. कॅनडा फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आहे आणि त्यामुळेच तेथील कायद्याचा फायदा घेऊन गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी होतात. फाशीच्या शिक्षेबाबत मोमेन म्हणाले की, आपली न्यायव्यवस्था खूप स्वतंत्र आहे आणि बांगलादेश सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र नूर चौधरीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. जर नूर चौधरी आणि रशीद चौधरी बांगलादेशात परतले तर ते बांगलादेशच्या राष्ट्रपतींकडे दयेची विनंती करू शकतात.

मोमेन म्हणाले की, राष्ट्रपती या दोघांवर दया दाखवू शकतात आणि त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलू शकतात. ते म्हणाले की, मानवी हक्कांचा अनेक लोकांनी अनेकदा गैरवापर केला आहे. खुन्यांना संरक्षण देण्यासाठी हे एक निमित्त झाले आहे हे खरोखरच दुर्दैवी आहे. बांगलादेशी मंत्री म्हणाले की, आमचे भारतासोबत खूप चांगले संबंध आहेत आणि कॅनडासोबतही चांगले संबंध आहेत. आम्ही नूर चौधरीसाठी कॅनडाला अनेकवेळा विनंती केली आहे, परंतु आजपर्यंत कॅनडा आमच्या आवाहनाकडे लक्ष दिलेले नाही.

टॅग्स :CanadaकॅनडाIndiaभारतBangladeshबांगलादेशJustin Trudeauजस्टीन ट्रुडो