व्हिसा मुलाखतीची वेळ लवकरात लवकर मिळवता येते का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 08:00 AM2017-12-18T08:00:00+5:302017-12-18T08:00:00+5:30

माझा अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचा विचार आहे. मला नुकताच आय-20 हा स्वीकृतीचा दाखला मिळाला असून तो सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी आहे. परंतु, लवकरात लवकरची स्टुडंट व्हिसा मुलाखतीची वेळ 20 जानेवारी आहे. मला मुलाखतीसाठी 20 जानेवारी पर्यंत थांबावं लागेल का?

Can I get visa interview time as soon as possible? | व्हिसा मुलाखतीची वेळ लवकरात लवकर मिळवता येते का?

व्हिसा मुलाखतीची वेळ लवकरात लवकर मिळवता येते का?

Next
ठळक मुद्देही प्रक्रिया सोपी आहे. आधी व्हिसाची फी भरा आणि ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करालवकरात लवकर कधी व्हिसा मुलाखतीची वेळ मिळतेय ती घ्यासरतेसेवटी, वेबसाईटवर जा आणि मुलाखत लवकर घ्यावी यासाठी अर्ज करा

प्रश्न - माझा अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचा विचार आहे. मला नुकताच आय-20 हा स्वीकृतीचा दाखला मिळाला असून तो सुरू होण्याची तारीख 10 जानेवारी आहे. परंतु, लवकरात लवकरची स्टुडंट व्हिसा मुलाखतीची वेळ 20 जानेवारी आहे. मला मुलाखतीसाठी 20 जानेवारी पर्यंत थांबावं लागेल का?

उत्तर - नाही, तुम्हाला त्यासाठी थांबायची गरज नाही. तुम्ही मुलाखत लवकर घ्यावी यासाठी अर्ज करू शकता. आम्हाला कल्पना आहे की शिक्षणसंस्थेमध्ये उशीरा जाणं त्रासदायक आहे. जर तुमचा अमेरिकेतील अभ्यासक्रम 60 दिवसात सुरू होणार असेल तर, मुलाखत लवकर घ्यावी यासाठी केलेला अर्ज आम्ही विचारात घेऊ.
ही प्रक्रिया सोपी आहे. आधी व्हिसाची फी भरा आणि ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करा. नंतर लवकरात लवकर कधी व्हिसा मुलाखतीची वेळ मिळतेय ती घ्या. सरतेसेवटी, वेबसाईटवर जा आणि मुलाखत लवकर घ्यावी यासाठी अर्ज करा. तुमची विनंती मान्य झाली तर तुम्हाला तसा मेल पाठवण्यात येईल. मग तुम्ही लवकर कुठल्या तारखेला व्हिसा मुलाखतीची वेळ मिळतेय हे ऑनलाइन बघू शकता आणि वेळ ठरवू शकता.
ज्यावेळी तुम्ही मुलाखतीसाठी कॉन्सुलेटमध्ये याल, त्यावेळी अपॉइंटमेंट लेचरची प्रिंट आणायला विसरू नका. त्याचबरोबर आय-20 दाखला, व्हिसा अर्ज असलेला फॉर्म आणि सोबत लागणारी कागदपत्रे घेऊन या.
याचप्रमाणे, वैद्यकीय कारणांसाठी व्हिसा मुलाखतीची वेळ लवकरात लवकर मागितल्यास माणुसकीच्या दृष्टीने आम्ही विचार करतो आणि त्वरा करतो. तसेच, अचानक आलेल्या व्यावसायिक कामांसाठी न्हिसा मुलाखतीची वेळ लवकरात लवकर मिळावी यासाठी ही प्रक्रिया करता येते.

Web Title: Can I get visa interview time as soon as possible?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.