महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:38 IST2026-04-09T13:37:54+5:302026-04-09T13:38:01+5:30

International News: रस्त्यावर, ट्रेनमध्ये, एखाद्या कार्यक्रमात आपल्यापेक्षा मोठ्या दिसणाऱ्या व्यक्तीला सर्रासपणे अंकल किंवा आंटी म्हणून हाक मारणं ही सामान्य बाब मानली जाते. मात्र कुणाला तरी आंटी म्हणून संबोधल्याने एखाद्याला कोर्टाने जबर आर्थिक दंड ठोठावल्याचं कधी ऐकलंय का?

Calling a woman aunty cost him dearly, police were called, court imposed a fine of lakhs | महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड

महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड

रस्त्यावर, ट्रेनमध्ये, एखाद्या कार्यक्रमात आपल्यापेक्षा मोठ्या दिसणाऱ्या व्यक्तीला सर्रासपणे अंकल किंवा आंटी म्हणून हाक मारणं ही सामान्य बाब मानली जाते. मात्र आपल्या समवयीन असलेल्यांकडून होणारा उल्लेख अनेकांना खटकतो. बऱ्याच जणांना आपल्याला अंकल किंवा आंटी म्हटलेलं चालत नाही. त्यावरून कधी कधी वादही होतात. मात्र कुणाला तरी आंटी म्हणून संबोधल्याने एखाद्याला कोर्टाने जबर आर्थिक दंड ठोठावल्याचं कधी ऐकलंय का? अशी एक घटना नुकतीच लंडनमध्ये घडली आहे. तसेच आपल्या ऑफिसमधील एका महिला सहकाऱ्याला सारखं आंटी म्हणणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर कोर्टानेही आंटी म्हटल्याने महिलेचा छळ झाल्याचं  निरीक्षण नोंदवत सदर इसमावर दंडात्मक कारवाई केली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हा अजब प्रकार लंडनमधील वेस्ट लंडन एनएचएस ट्रस्टमध्ये घडला आहे. येथे हेल्थकेअर असिस्टंट एल्डा एस्टेवेस हिने तिचा टीम लिडर चार्ल्स ओपोंग याच्याविरोधात सप्टेंबर २०२३ रोजी ईमेलच्या माध्यमातून तक्रार दिली होती. चार्ल्स हा आपल्याला वारंवार आंटी म्हणून हाक मारतो. तसेच आपल्याला नाव घेऊन हाक मारा, असे वारंवार सांगूनही तो ऐकत नाही, असा आरोप एल्डा हिने केला होता. त्यानंतर आपला बचाव करताना चार्ल्स ओपोंग याने घानाच्या संस्कृतीमध्ये आंटी हा शब्द सन्मान आणि आदराने घेतला जातो, असा तर्क दिला. मात्र कोर्टाने त्याचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. तसेच व्यावसायिक वातावरणात असे संबोधणे चुकीचे असल्याचे सांगितले.

तसेच या प्रकरणी सुनावणी करताना ट्रिब्युनल जज जॉर्ज एलियट यांनी कठोर भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की चार्ल्स ओपोंग हे टीम लिडर म्हणून जबाबदार पदावर होते. त्यांनी अशा प्रकारची टिप्पणी अजिबात करता कामा नये होती. ऑफिसमध्ये कामाच्या वेळी अशा शब्दांचा वापर केल्याने अपमानजनक वातावरण निर्माण होते. कुठल्याही संस्कृतीत आंटी असे संबोधणे सन्माननीय असेलही, मात्र समोरच्या व्यक्तीला ते आवडत नसेल तर त्याच्यावर अशी बाब जबरदस्तीने लादणे योग्य नाही, असे कोर्टाने बजावले. तसेच चार्ल्स ओपोंग याला  १४२५ पौंड्स म्हणजेच सुमारे दीड लाख रुपयांचा दंड ठोठावला. 

Web Title : महिला को 'आंटी' कहना पड़ा महंगा: पुलिस बुलाई, भारी जुर्माना लगा।

Web Summary : लंदन में एक व्यक्ति को अपनी सहकर्मी को बार-बार 'आंटी' कहने पर £1425 का जुर्माना लगाया गया। अदालत ने इसे अपमानजनक कार्य वातावरण माना और सांस्कृतिक सम्मान की उसकी दलील को खारिज कर दिया।

Web Title : Calling woman 'Aunty' costly: Police called, hefty fine imposed.

Web Summary : A London man was fined £1425 for repeatedly calling a colleague 'Aunty' despite her objections. The court ruled it created an offensive work environment, rejecting his defense of cultural respect.