Howdy Modi: ...अन् मोदींच्या मंत्र्यांनी ट्विटर प्रोफाईल पिक्चर बदलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 21:27 IST2019-09-22T21:26:01+5:302019-09-22T21:27:14+5:30
पंतप्रधान मोदी, अमित शहांनी प्रोफाईल पिक्चर बदललेला नाही

Howdy Modi: ...अन् मोदींच्या मंत्र्यांनी ट्विटर प्रोफाईल पिक्चर बदलले
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी ट्विटरवर त्यांचे प्रोफाईल पिक्चर बदलले आहेत. अनेकांनी 'हाऊडी मोदी' प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे.
महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, माजी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी 'हाऊडी मोदी' ट्विटरवर प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे. याशिवाय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी यासंबंधी एक ट्विटदेखील केलं आहे. 'सव्वाशे कोटी भारतीयांसोबतच मीदेखील हाऊडी मोदी पाहण्यासाठी उत्सुक आहे. पंतप्रधान मोदी आज संपूर्ण जगाला संबोधित करतील,' असं गडकरींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, पीएममो राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनीदेखील ट्विटरवर हाऊडी मोदी प्रोफाईल पिक्चर ठेवला आहे. मात्र खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरील त्यांचा प्रोफाईल पिक्चर बदललेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीदेखील त्यांचा प्रोफाईल पिक्चर बदललेला नाही.