शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खेळ मांडला; मक्केच्या मशिदीत 'चारचौघी' बोर्ड गेम खेळल्या, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 10:49 AM

पवित्र मशिदीत अशाप्रकारे खेळाचा डाव मांडणे अयोग्य

रियाध: इस्लामधर्मीयांसाठी पवित्र ठिकाण असलेल्या मक्का येथील एक घटना सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. मक्का येथील मशिदीत काही बुरखाधारी महिला 'बोर्ड गेम' खेळत असतानाचा एक फोटो सोशल  मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरून सौदी अरेबियात मोठा वाद पेटला आहे. हा प्रश्नाने इतके गंभीर स्वरुप धारण केले की, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सौदी अरेबियाच्या सरकारला पत्रकारपरिषद घेऊन याविषयी माहिती द्यावी लागली.गेल्या आठवड्यात शुक्रवारी सकाळी 11 वाजता चार महिला मशिदीत 'सिक्वेन्स' हा बोर्ड गेम खेळत बसल्या होत्या. काही वेळातच ही गोष्ट सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आली. त्यानंतर याठिकाणी महिला अधिकाऱ्यांना पाठवून संबंधित महिलांना पुन्हा असा प्रकार न करण्याविषयी समज देण्यात आली. येथील पावित्र्य जपले जावे, असेही अधिकाऱ्यांनी महिलांना सांगितले. त्यानंतर आपली चूक मान्य करून महिला तेथून निघून गेल्या. परंतु, त्यानंतर या महिलांचे बोर्ड गेम खेळत असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले. संपूर्ण अरब जगतात हे छायाचित्र चर्चेचा विषय झाल्याची माहिती 'स्टेप फीड' या संकेतस्थळाने दिली. या छायाचित्रावर अनेक परस्परविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काहीजणांनी पवित्र मशिदीत अशाप्रकारे खेळाचा डाव मांडणे अयोग्य असल्याचे सांगत या प्रकाराविषयी नापसंती दर्शविली आहे. यापूर्वी 2015 मध्ये सौदी अरेबियातील मस्जिद-ए-नबवी येथे काही तरूण मुले पत्ते खेळताना आढळली होती. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. या मुलांना अटकही करण्यात आली होती. 

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबिया