अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 39 देशांच्या नागरिकांसाठी अमेरिकेत प्रवेशाबाबत कठोर नियम लागू केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या निर्णयाच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेतील बुर्किना फासो आणि माली या दोन देशांनी अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
ट्रंम्प प्रशासनाच्या निर्णयाला प्रत्युत्तर
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत प्रवेशासाठी कडक निर्बंध लागू केले होते. काही देशांवर पूर्ण बंदी, तर काही देशांवर कठोर अटी लादण्यात आल्या. आता या निर्णयाविरोधात संबंधित देशांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. बुर्किना फासो आणि माली यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अमेरिकेने त्यांच्या नागरिकांसाठी जे नियम लागू केले आहेत, तेच नियम आता अमेरिकन नागरिकांसाठी लागू केले जातील.
समान नियम लागू करू
बुर्किना फासोचे परराष्ट्र मंत्री करामाओ जीन मेरी त्राओरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, आमच्या नागरिकांसाठी अमेरिकेने जे प्रवेश नियम लादले आहेत, तेच नियम आता अमेरिकन नागरिकांनाही लागू असतील.
अमेरिकेच्या निर्णयावर टीका
मालीच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अधिकृत निवेदन जारी करत अमेरिकन नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध जाहीर केले आहेत. तसेच, अमेरिकेने कोणतीही चर्चा किंवा सल्लामसलत न करता इतका महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल मालीने खेद व्यक्त केला आहे.
39 देशांवर निर्बंध, त्यातील 25 आफ्रिकी
ट्रम्प प्रशासनाने ज्या 39 देशांच्या नागरिकांवर अमेरिका प्रवेशासाठी पूर्ण किंवा अंशतः निर्बंध लादले आहेत, त्यापैकी तब्बल 25 देश आफ्रिकेतील आहेत. या यादीत सीरिया, पॅलेस्टाईन, नायजर, सिएरा लिओन आणि दक्षिण सुदानसारख्या गरीब देशांचा समावेश आहे. तर सेनेगल आणि आयव्हरी कोस्टच्या नागरिकांवर अंशतः निर्बंध घालण्यात आले आहेत.
फीफा वर्ल्ड कपवरही परिणाम?
या निर्बंधांमुळे आगामी FIFA वर्ल्ड कप बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा वर्ल्ड कप अमेरिका आणि कॅनडामध्ये होणार आहे. ट्रंप प्रशासनाने स्पष्ट केले आहे की स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रवेश दिला जाईल, मात्र चाहत्यांच्या प्रवेशाबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडलेली नाही.
Web Summary : Following Trump's strict entry rules, Burkina Faso and Mali banned American citizens. This retaliatory move mirrors US restrictions. Other nations may follow suit. Concerns arise about FIFA World Cup access for fans.
Web Summary : ट्रम्प के सख्त प्रवेश नियमों के बाद, बुर्किना फासो और माली ने अमेरिकी नागरिकों पर प्रतिबंध लगा दिया। यह प्रतिशोधात्मक कदम अमेरिकी प्रतिबंधों को दर्शाता है। अन्य देश भी ऐसा कर सकते हैं। फीफा विश्व कप में प्रशंसकों की पहुंच को लेकर चिंताएं।