शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 15:49 IST

इंडो-पॅसिफिक भागातील शीत युद्धानंतर हेच सर्वात महत्वाचे भूराजकीय आव्हान आहे. या तैनातिनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एक कायम होईल?

ठळक मुद्देइंडो-पॅसिफिक भागातील शीत युद्धानंतर हेच सर्वात महत्वाचे भूराजकीय आव्हान या तैनातिनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एक कायम होईल, असे डोनाल्‍ड ट्रम्प प्रशासनाला वाटते. स्‍वेज कालव्याजवळ अधिक सैनिक तैनात करून चीनवर दबाव टाकला जाऊ शकतो, असे ब्रिटिश सैन्याला वाटते.

वॉशिंगटन/लंडन - भारतासह संबंद आशियातील शेजारील देशांसोबत दादागिरी करणाऱ्या चीनचे नाक ठेसण्यासाठी दोन बलाढ्य देशांनी कंबर कसली आहे. अमेरिकेने आपले हजारो सैनिक जपानपासून ऑस्‍ट्रेलियापर्यंत संपूर्ण आशियात तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

इंडो-पॅसिफिक भागातील शीत युद्धानंतर हेच सर्वात महत्वाचे भूराजकीय आव्हान आहे. या तैनातिनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एक कायम होईल, असे डोनाल्‍ड ट्रम्प प्रशासनाला वाटते. अमेरिकेशिवाय इंग्लंडनेही आपले हजारो कमांडोज अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्वेज कालव्याजवळ तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिका जर्मनीमध्ये तैनात असलेले आपले हजारो सैनिक आता आशियात तैनात करणार आहे. हे सैनिक अमेरिकेच्या गुआम, हवाई, अलास्‍का, जपान आणि ऑस्‍ट्रेलियातील सैन्‍य ठिकानांवर तैनात केले जातील. जपानच्या निक्‍केई आशियन रिव्‍ह्यूच्या अहवालामुसार आता अमेरिकेची प्राथमिकता बदलली आहे. शीत युद्धाच्या काळात, सोव्हियत संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी युरोपात मोठ्या प्रमाणावर सैन्य ठेवणे आवश्यक आहे, असे अमेरिकन तज्ज्ञांचे मत होत.

अमेरिकेच्या निशाण्यावर चीन -अहवालात म्हणण्यात आले आहे, की वर्ष 2000च्या दशकात अमेरिकेचे मुख्य लक्ष्य दहशतवाद होते. त्यांनी इराक आणि अफगानिस्‍तानमधील दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले होते.  ट्रम्प यांचे राष्‍ट्रीय संरक्षण सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी गेल्या महितीन्यात आपल्या एका लेखात म्हटले होते, की 'चीन आणि रशिया सारख्या दोन महाशक्तींशी स्पर्धा करण्यासाठी अमेरिकन सैन्याला निश्चितपणे पुढील भागांत पूर्वीच्या तुलनेत अधिक झपाट्याने सैन्य तैनाती वाढवावी लागेल.' यामुळे आता अमेरिका जर्मनीतील आपले सैन्य 34, 500वरून 25 हजारवर आणत आहे आणि उर्वरित 9,500 सैनिक इंडो-पॅसिफिक भगांत तैनात करत आहे. 

चीनचा सामना करण्यासाठी इंग्लंड आशियात पाठवतोय सैनिक -फायनाशियल टाइम्‍सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनचा धोका ओळखून त्याचा सामना करण्यासाठी, आता अमेरिकेनंतर इंग्लंडदेखील आपले सैन्य आशियात पाठवत आहे. आशियातील सहकारी देशांशी जवळीक वाढवून आणि स्‍वेज कालव्याजवळ अधिक सैनिक तैनात करून चीनवर दबाव टाकला जाऊ शकतो, असे ब्रिटिश सैन्याला वाटते. यासाठी इंग्लंडच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी मंत्र्यांची भेट घेतली होती. स्‍वेज कालवा हा जगातील सर्व जास्त व्‍यस्‍त मार्ग आहे. तसेच चीनचे मोठ्या प्रमाणावर सामान याच मार्गाने युरोपात जाते.

कोरोना व्हायरस संपुष्टात आल्यानंतर जगभरात आर्थिक संकट, वाद आणि तंटे वाढतील, असा इशारा इंग्लंडचे संरक्षण मंत्री बेन वालेस यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

चीन सीमेवर तणाव वाढतोय, पंतप्रधान मोदींनी घेतली राष्‍ट्रपतींची भेट; अर्धातास चालली चर्चा

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावborder disputeसीमा वादAmericaअमेरिकाEnglandइंग्लंडJapanजपानAustraliaआॅस्ट्रेलियाBorderसीमारेषा