भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:46 IST2025-11-10T19:45:53+5:302025-11-10T19:46:15+5:30
'या' देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था इतकी बिकट झाली आहे की, हा देश पैशासाठी काहीही करण्यास तयार झाला आहे.

भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था इतकी बिकट झाली आहे की, हा देश पैशासाठी काहीही करण्यास तयार झाला आहे. चीनच्या प्रचंड कर्जाखाली दबलेला हा देश एका प्रकारे बीजिंगचे 'अधीनस्थ राज्य' बनला आहे. पण चीनवरील या वाढत्या अवलंबित्वाचे आणखी एक क्रूर आणि वेदनादायक प्रकरण समोर आले आहे, जे जाणून घेतल्यावर कोणालाही धक्का बसेल.
सीमावर्ती भागातील अल्पवयीन पाकिस्तानी मुलींना 'वधू बाजारात' केवळ ७०० डॉलर्समध्ये म्हणजे अंदाजे ५८,००० रुपयांमध्ये चिनी पुरुषांना विकले जात आहे. मानवाधिकार संघटनांच्या मते, ही अमानवी प्रथा पाकिस्तानच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सुरू झाली आहे.
गरिबीमुळे आई-वडिलांची लाचारी
पाकिस्तानच्या दूरच्या सीमावर्ती गावांमध्ये गरिबी टोकाची आहे. याच कारणामुळे गरीब कुटुंबे आपल्या मुलींचे लग्न अमीर चिनी पुरुषांशी किरकोळ रकमेच्या बदल्यात करण्यास तयार होत आहेत. रिपोर्ट्सनुसार, चिनी आणि पाकिस्तानी दलालांचे गट असहाय्य पालकांना आमिष दाखवून ७०० ते ३२०० डॉलर्स (सुमारे २ ते ९ लाख पाकिस्तानी रुपये) पर्यंतची रक्कम देऊ करतात.
दुसरीकडे, हे दलाल एका मुलीसाठी २५,००० ते ६५,००० डॉलर्स पर्यंत मोठी रक्कम घेतात. सोशल मीडियावर 'दीड लाखात पत्नी' किंवा 'फुकटात सासर' अशा प्रकारे या दुर्दैवी लोकांची खिल्ली उडवणारे मीम्स व्हायरल होत असले तरी, सत्य यापेक्षा कितीतरी अधिक क्रूर आहे. सीमावर्ती भागांमध्ये, गरिबीमुळे कुटुंबे आपल्या अल्पवयीन मुलींना लग्नाच्या नावाखाली चिनी खरेदीदारांच्या हवाली करत आहेत.
तपास यंत्रणांनी केलेल्या तपासणीत असे आढळले आहे की, यातील बहुतेक पीडित मुली १२ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत. आणखी भयानकम्हणजे काहीवेळा तर आजारी आई-वडील किंवा भाऊ-बहीण देखील वधूसोबत चीनला जातात.
चीनमध्ये गुलामगिरी आणि वेश्यावृत्ती
तपासात ६२९ हून अधिक प्रकरणांचे काळे सत्य समोर आले आहे. दलालांच्या संघटित टोळ्यांनी 'विवाह'च्या बहाण्याने अल्पवयीन मुलींना चीनला पाठवले. या मुलींना तिथे मजुरीसाठी वेठबिगारी करावी लागते किंवा त्यांच्याच लोकांनी त्यांना वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे.