शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

BRICS: चीनच्या पत्रकार महिलेने गायिले हिंदी गाणे,  'आजा रे...आजा रे ओ मेरे दिलबर आजा' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 23:00 IST

चीनमध्ये आजपासून ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. बिक्र्स देशांचे अनेक पत्रकार सुद्धा परिषदेच्या वार्तांकनासाठी दाखल झाले. यावेळी एका चीनच्या रेडिओ पत्रकार महिलेने हिंदीमध्ये गाणे गायिले. 

शियामेन, दि. 4 - चीनमध्ये आजपासून ब्रिक्स (ब्राझील-रशिया- भारत-चीन-दक्षिण अफ्रिका) देशांच्या शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे. बिक्र्स देशांचे अनेक पत्रकार सुद्धा परिषदेच्या वार्तांकनासाठी चीनमध्ये दाखल झाले. यावेळी एका चीनच्या रेडिओ पत्रकार महिलेने हिंदीमध्ये गाणे गायिले. तांग युआंगई असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. भारतीय पत्रकारांसोबत तांग युआंगई ब्रिक्स परिषदेचे वार्तांकन करत होती. त्यावेळी उपस्थित भारतीय पत्रकारांनी तिला विचारले की, तुम्हाला हिंदी भाषा बोलता येते का, यावर ती म्हणाली, थोडी-थोडी येते. यावेळी पत्रकारांनी तिला हिंदी चित्रपटातील एखादे आवडीचे गाणे गाण्याची विनंती केली, त्यावर तिने 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नूरी' या चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय 'आजा रे...आजा रे ओ मेरे दिलबर आजा' हे  गाणे गायिले. वृत्तसंस्था एएनआयसोबत बातचीत करताना तांग युआंगई हिने सांगितले की,  भारताविषयी मला खूप प्रेम आहे. भारतातील एका विद्यापीठातून हिंदी भाषा अवगत केली आहे. तसेच, भारतातील अनेक लोकांसोबत मी प्रवास केला आहे. भारतीय लोकांना भेटल्यानंतर मला समजते की, भारतीय लोक जास्त इमानदार आणि चांगले असतात. यामुळेच मला भारताविषयी जास्त प्रेम वाटते.

दरम्यान, पाच दिवसांच्या ब्रिक्स परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये काल (दि.3) दाखल झाले आहेत.  ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शांती आणि विकासासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच, नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचे तज्ञ सांगत आहेत. 

मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - - विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं.- आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.- ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.-  आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे. - भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे.  

टॅग्स :chinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदी