शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
6
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
7
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
8
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
9
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
10
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
11
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
12
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
13
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
14
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
15
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
16
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
17
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
18
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
19
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

Breaking : कोरोनावर रामबाण औषध सापडले; 'जन्मदात्या' चीनचाच दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 21:57 IST

Corona virus : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील जवळपास 50 हून अधिक देश त्रस्त झाले आहेत. भारतातही गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण आढळू लागले आहेत.

ठळक मुद्देइटलीहून आलेले 16 पर्यटक यामध्ये आहेत. त्यांच्या तब्बल 216 जण संपर्कात आले होते.आज कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याने पेटीएम कंपनीलाही टाळे ठोकावे लागले आहे.यामुळे हा व्हायरस भारतभर पसरण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे.

शांघाय : चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याने पेटीएम कंपनीलाही टाळे ठोकावे लागले आहे. तर या जिवघेण्या व्हायरसचे उगमस्थान असलेल्या चीननेच रामबाण औषध शोधल्याचा दावा केला आहे. लवकरच या औषधाचे वितरण करण्यात येणार असल्याचेही चीनने म्हटले आहे. 

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील जवळपास 50 हून अधिक देश त्रस्त झाले आहेत. भारतातही गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण आढळू लागले आहेत. इटलीहून आलेले 16 पर्यटक यामध्ये आहेत. त्यांच्या तब्बल 216 जण संपर्कात आले होते. यामुळे हा व्हायरस भारतभर पसरण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, चीनने त्रस्त झालेल्या जगाला आनंदाची बातमी दिली आहे. 

चीनने कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा केला आहे. हे औषध चीनी सैन्याच्या त्याच मेजर जनरलच्या टीमने शोधले आहे, ज्याने काही वर्षांपूर्वी सार्स आणि इबोलासारख्या खतरनाक व्हायरसवर औषध शोधले होते. या औषधाच्या शोधामुळे त्याने जगाला मोठ्या संकटापासून वाचविले होते. आता पुन्हा असा चमत्कार होण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. 

गेल्या महिन्याभरापासून चीनी सैन्याची एक वैद्यकीय टीम कोरोना व्हायरसवर लस शोधण्याच्या कामी लागली होती. पिपल्स लिबरेशन आर्मीचे वैद्यकीय तज्ज्ञ शेन वेई यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करण्यातय येत होते. चायना सेंट्रल टेलिव्हिजनने याचे वृत्त दिले आहे. वेई यांच्या टीमने कोरोनावर लस शोधण्यात यश मिळविले आहे. 

याच संशोधकाने जगाला दोनदा वाचविले53 वर्षांच्या वेई यांनी सांगितले की, त्यांची टीम अहोरात्र मेहनत घेत होती. याच टीमने 2002 मध्ये सार्स आणि 2014 मध्ये इबोला सारख्या भयंकर व्हायरसवर लस शोधली होती. त्यांच्या टीमने मिलिट्री मेडिकल सायन्स अकादमीसोबत मिळून हा शोध लावला आहे. या अकादमीमध्ये 26 तज्ज्ञ, 50 हून अधिक वैज्ञानिक आणि 500 हून जास्त अनुभवी वैद्यकीय अधिकारी काम करतात. ही लस लवकरच उपचारासाठी उपलब्ध करण्याचा दावा चीनने केला आहे. 

Corona Virus: पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद

coronavirus : अशी घ्या काेराेनापासून काळजी

देशात आता केवळ पाचच सरकारी बँका उरणार; पाहा तुमची बँक कोणती

दुसऱ्या राज्यात नोकरीसाठी जाताय; वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही?

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारत