Arthur O Urso: एक झेपेना! 'सनकी' मॉडेलने एकाचवेळी 9 तरुणींशी लग्न केले; कायतर म्हणे 'Free Love'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 14:43 IST2021-11-18T14:42:25+5:302021-11-18T14:43:19+5:30
Arthur O Urso Marry with 9 girls: आर्थरने पहिले लग्न लुआना काजकी नावाच्या मुलीशी केले होते. तिने त्याला एका कुत्रा बनवून रेल्वे स्थानकावर नेले होते.

Arthur O Urso: एक झेपेना! 'सनकी' मॉडेलने एकाचवेळी 9 तरुणींशी लग्न केले; कायतर म्हणे 'Free Love'
ब्राझीलियन मॉडेल आर्थर ओ उर्सोने 'Free Love' साजरे करण्यासाठी सामुहिक विवाह केला. यावेळी त्याने एकाचवेळी तीन महिलांसोबत लग्न केले. हे लग्न साओ पाउलो शहरातील एका कॅथॉलिक चर्चमध्ये झाले. आर्थरने पहिले लग्न लुआना काजकी नावाच्या मुलीशी केले होते. तिने त्याला एका कुत्रा बनवून रेल्वे स्थानकावर नेले होते.
आता स्वतंत्र प्रेम आणि एका विवाहाच्या विरोधात आर्थरने आणखी नऊ महिलांशी लग्न केले. त्याला औपचारिक रुपही दिले. याच्या आधी आर्थरने लुआनासोबत कॅप डी एगडेमध्ये हनीमून साजरे करतानाचे फोटो शेअर केले होते. या फोटोंत ते विवस्त्र होते. हे फोटो खूप व्हायरल झाले होते.
आर्थर आणि लुआना हे शहरातील विविध पर्यटन स्थळांवर विवस्त्र होऊन फिरले. ही जोडी स्ट्रिपिंगच्या प्रेमासाठी ओळखली जाऊ लागली आहे. या आधीही त्यांनी जगातील विविध ठिकाणांवर विवस्त्र फिरण्याचे प्रताप केले आहेत. यामुळे ते जगभरात चर्चेत असतात.
फेब्रुवारीमध्ये या जोडप्याने सर्वांचे आणखी एका विचित्र गोष्टीवरून लक्ष वेधून घेतले होते. ते दुसऱ्यांना शरीर संबंधांसाठी प्रोत्साहित करतात. यासाठी ते onlyfans वर दर महिन्याला 56,000 पाउंड म्हणजेच 56 लाख रुपये कमवितात. कोरोना महामारीत आर्थर आणि लुआना यांनी ज्या लोकांची सेक्स लाईफ बिघडली आहे, त्या लोकांना सेक्स टिप्स दिल्या.
कुत्र्याचा पोशाख घालून फिरविले...
आर्थरची पत्नी लुआना काजकी ने लग्न झाल्यावर त्याला कुत्र्याच्या पोशाखात सार्वजनिक ठिकाणी फिरविले. त्याच्या गळ्यात पट्टा बांधला, कुत्र्याचे मास्क घातले आणि गर्दीच्या रेल्वे स्थानकावर घेऊन गेली. ती अशी फिरत होती की कुत्र्यालाच फिरवायला आली आहे. असे केल्याने कामवासना वाढत असल्याचा दावा या दोघांनी केला होता.