ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 08:31 IST2025-10-29T08:31:39+5:302025-10-29T08:31:52+5:30
Brazil Drug Raid: माफियांकडून पोलिसांवर ड्रोनद्वारे हल्ले; ४ पोलीस शहीद, शहरात युद्धसदृश परिस्थिती आणि ५० हून अधिक बसेस ताब्यात

ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
ब्राझीलची राजधानी रिओ डी जनेरिओ येथे ड्रग माफियांविरुद्ध 'युद्ध'जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक भागांत समांतर सरकार चालवणाऱ्या आणि देशातील सर्वात जुन्या तसेच खतरनाक 'ड्रग लॉर्ड्स'पैकी एक असलेल्या रेड कमांडो या टोळीच्या तळांवर पोलिसांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे अभियान छेडले आहे.
राज्य सरकार आणि रिओच्या महापौरांनी सुरू केलेल्या 'ऑपरेशन रिओ पॅसिफिकाडो' अंतर्गत, पोलिसांनी हेलिकॉप्टर आणि चिलखती वाहनांच्या मदतीने रेड कमांडो आणि अन्य टोळ्यांच्या तळांवर मोठे छापे टाकले. या जोरदार चकमकीत ६० ड्रग तस्कर ठार झाले, तर टोळीच्या हल्ल्यात ४ पोलीस अधिकारी शहीद झाले. या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत एकूण ६४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
माफियांकडून ड्रोनचा वापर
या कारवाई दरम्यान, पोलिसांनी कोकेन आणि ७५ हून अधिक रायफल जप्त केल्या. विशेष म्हणजे, ड्रग माफियांनी प्रत्युत्तर देण्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर करत पोलिसांवर हल्ले केले. या टोळ्यांनी शहरात दहशत निर्माण करण्यासाठी ५० हून अधिक बसेसवर कब्जा केला आणि अनेक ठिकाणी रस्ते बंद केले.
'रेड कमांडो' टोळी
'Comando Vermelho' (लाल कमांडो) ही ब्राझीलमधील सर्वात जुनी आणि प्रभावशाली टोळी असून, त्यांची स्थापना १९७० च्या दशकात झाली होती. ही टोळी केवळ ड्रग तस्करीच नव्हे, तर अवैध शस्त्रे, जमीन बळकावणे आणि स्थानिक लोकांकडून 'सुरक्षा कर' गोळा करण्यातही सक्रिय आहे. पोलिसांनी या टोळीच्या समूळ उच्चाटनासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.