Brain-Eating Amoeba: पोहताना डोक्यात घुसला मेंदू पोखरणारा व्हायरस; अमेरिकन मुलाची घरी येताच तब्येत बिघडली, मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 15:26 IST2022-08-21T15:22:51+5:302022-08-21T15:26:21+5:30
Brain-Eating Amoeba in America: गोड्या पाण्यातील तलाव, नद्या, कालवे आणि तलावांमध्ये धोका. अमेरिकेत आतापर्यंत चार जणच वाचले.

Brain-Eating Amoeba: पोहताना डोक्यात घुसला मेंदू पोखरणारा व्हायरस; अमेरिकन मुलाची घरी येताच तब्येत बिघडली, मृत्यू
अमेरिकेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नदीतून अंघोळ करून एक १३ वर्षीय मुलगा घरी आला, पोहोचताच त्याची तब्येत बिघडली आणि उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. तसे पाहता त्याला काहीच झाले नव्हते, परंतू पोहत असताना एका खतरनाक व्हायरसने त्याच्या डोक्यात प्रवेश केला होता.
डॉक्टरांनुसार मुलाच्या डोक्यात मेंदू खाणारा अमिबा व्हायरस घुसला होता. त्यामुळे त्याच्या शरीरात संक्रमन झाले आणि उपचारावेळी त्याने अखेरचा श्वास घेतला. द मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही घटना अमेरिकेच्या नेब्रास्का येथील आहे. इल्कहॉर्न हा मुलगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. तेव्हा हा व्हायरस नाकावाटे त्याच्या डोक्यात शिरला. यामुळे त्याला १० दिवसांनी मृत्यू झाला.
मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे पसरणाऱ्या दुर्मिळ प्रकारच्या संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाला. डग्लस काउंटीच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, मुलाला प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (PAM) नावाचा दुर्मिळ मेंदू संसर्ग झाला होता. हा संसर्ग Naegleria Fowleri amoeba मुळे होतो. हा अमिबा इतका धोकादायक आहे की तो मेंदूच्या पेशी खातो, ज्यामुळे मानवी मेंदूमध्ये संसर्ग पसरतो आणि त्याचा मृत्यू होतो. नेग्लेरिया फॉलेरी अमीबा इतका लहान आहे की तो सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसत नाही.
पाण्यात आढळणारा हा अमिबा नाकातून शरीरात प्रवेश करू शकतो, जिथे तो नाकातून मेंदूपर्यंत जातो. हा अमिबा अनेकदा गोड्या पाण्यातील तलाव, नद्या, कालवे आणि तलावांमध्ये वाढतो. सीडीसीनुसार अमेरिकेच दरवर्षी सुमारे तीन रुग्ण सापडतात. 1962 ते 2021 दरम्यान 154 रुग्ण सापडले होते. यापैकी फक्त चार जण वाचले होते. जगभरात आतापर्यंत या अमिबाचे 430 रुग्ण सापडले होते.