'कोरोना लस घ्याची नाही, नाही तर ब्रेकअप करीन'; तरुणाची गर्लफ्रेंडला धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 08:57 PM2021-09-15T20:57:09+5:302021-09-15T20:58:52+5:30

या तरुणीने सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केली आहे आणि यासंदर्भात काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न लोकांना विचारला आहे.

Boyfriend said to girlfriend do not take vaccine otherwise breakup | 'कोरोना लस घ्याची नाही, नाही तर ब्रेकअप करीन'; तरुणाची गर्लफ्रेंडला धमकी!

'कोरोना लस घ्याची नाही, नाही तर ब्रेकअप करीन'; तरुणाची गर्लफ्रेंडला धमकी!

Next

कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर शास्त्रज्ञ मंडळी लस तयार करण्यात यशस्वी झाले. यानंतर, जगातील सर्वच देशांनी आपल्या लोकांचे वेगाने लसीकरण करण्यास सुरवात केली. असे असतानाही, काही लोक लस घेण्यापासून दूर राहत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर येत आहेत. असेच एक प्रकरण इंग्लंडमधून समोर आले आहे. येथे एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला विचित्र धमकी दिली आहे. जर कोरोना लस घेतली, तर मी ब्रेकअप करीन, असे या तरुणाने म्हटले आहे.

'मिरर' मधील एका वृत्तानुसार, या तरुणीने सोशल मीडियावर आपली कहाणी शेअर केली आहे आणि यासंदर्भात काय निर्णय घ्यावा, असा प्रश्न लोकांना विचारला आहे. याच बरोबर आम्ही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहोत, असेही या तरुणीने म्हटले आहे. या तरुणीने कोरोनाचा पहिला डोस फार पूर्वीच घेतला आहे. मात्र आता दुसरा डोस घेण्याची वेळ आली असतानाच तिच्या प्रियकराने तिला दुसरा डोस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यानंतर तरुणी विचारात पडली आहे.

'शेजारची बाई माझ्या पतीला अंडरगारमेंट्स दाखवते'; पत्नीनं थेट पोलीस ठाणंच गाठलं!

याच बरोबर, तरुणीने असेही म्हटले आहे, की आपण लस घेतली, तर चागले होणार नाही, अशी धमकी बॉयफ्रेंडने दिली आहे. याशिवाय, जेव्हा आपण पहिला डोस घेतला होता, तेव्हा आपली प्रकृती खालावली होती, बरेच दिवस ताप होता आणि त्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडनेच तिची काळजी घेतली, असेही तेने सांगितले.

संबंधित वृत्तात सांगण्यात आले आहे, की संबंधित तरुणीने आपली बाजू मांडताना, तिला लस घ्यायची आहे, कारण तिला आपले शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार कोरोना लसीकरण पूर्ण करायचे आहे. जर लस घेतली नाही, तर आपल्याला प्रवेश मिळू शकणार नाही, असे म्हटले आहे. आधी आपला बॉयफ्रेंड केवळ मजाक करतोय असे या तरुणीला वाटत होते. मात्र, तो गंभीर होता. 

यावर, काही लोकांनी तिला तिच्या बॉयफ्रेंजला कारण विचारायला सांगितले आहे. तर एका व्यक्तीने तिला आपल्या बॉयफ्रेंडला व्यवस्थीत समजावून राजी करायला हवे, कारण लस घेणेही आवश्यक आहे, असा सल्ला दिला आहे.
 

 

Web Title: Boyfriend said to girlfriend do not take vaccine otherwise breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app