हृदयद्रावक! अंघोळ करताना अचानक डोक्यात शिरला मेंदू खाणारा किडा; 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 14:27 IST2022-08-23T14:26:06+5:302022-08-23T14:27:21+5:30

मुलाच्या डोक्यामध्ये अचानक एक मेंदू खाणारा किडा शिरला आणि यामुळे शरीरात त्याचा संसर्ग झाला आणि रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

boy killed by brain eating amoeba entered head through nose while taking bath in river | हृदयद्रावक! अंघोळ करताना अचानक डोक्यात शिरला मेंदू खाणारा किडा; 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

हृदयद्रावक! अंघोळ करताना अचानक डोक्यात शिरला मेंदू खाणारा किडा; 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

नदीवरुन अंघोळ करून परतलेल्या एका 13 वर्षीय मुलाची तब्येत अचानक बिघडली. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांना धक्काच बसला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या डोक्यामध्ये अचानक एक मेंदू खाणारा किडा शिरला आणि यामुळे शरीरात त्याचा संसर्ग झाला आणि रुग्णालयात मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

द मिररने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील Nebraska या गावात ही घटना घडली आहे. येथे 13 वर्षीय मुलगा Elkhorn नदीत अंघोळ करण्यासाठी गेला होता. अंघोळ करीत असताना एक किडा मुलाच्या नाकावाटे त्याच्या डोक्यात शिरला. यानंतर मुलाच्या शरीरात संसर्ग पसरला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र येथेच उपचारादरम्यान 10 दिवसांनी त्याने जीव गमावला आहे.

मुलाचा मृत्यू मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे पसरणाऱ्या एका दुर्मिळ प्रकारच्या संसर्गामुळे झाला आहे. डगलस काऊंटी आरोग्य विभागानुसार, मुलाला प्राथमिक अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस नावाचा दुर्मिळ मेंदूचा संसर्ग झाला होता. हा संसर्ग Naegleria Fowleri अमिबामुळे होतो.

हा अमिबा इतका धोकादायक असतो की, मेंदूचे सेल्स खातो. ज्यामुळे व्यक्तीच्या मेंदूत संसर्ग पसरतो आणि त्याचा मृत्यू होता. Naegleria Fowleri अमिबा इतका लहान असतो की, हा सूक्ष्मदर्शीशिवाय पाहता येऊ शकत नाही. मात्र हा छोटासा जीव व्यक्तीचा जीवही घेऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: boy killed by brain eating amoeba entered head through nose while taking bath in river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.