कार्यालयात बॉसला महिलेने झाडूने मारले, अश्लील मेसेजेस पाठवायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 07:39 AM2021-04-16T07:39:38+5:302021-04-16T07:40:18+5:30

Boss beaten by woman in office : ही घटना आहे चीनच्या हेईलोंगजियांग प्रांतातील सरकारी कार्यालयातील. ही महिला तिच्या बॉसला झाडूने मारताना, त्याच्या तोंडावर पाणी फेकताना व त्याच्या खोलीत ठेवलेली पुस्तके त्याला मारताना दिसते.

Boss beaten by woman in office, used to send obscene messages | कार्यालयात बॉसला महिलेने झाडूने मारले, अश्लील मेसेजेस पाठवायचा

कार्यालयात बॉसला महिलेने झाडूने मारले, अश्लील मेसेजेस पाठवायचा

Next

सरकारी कर्मचारी महिलेने तिचा वरिष्ठ खूप त्रास देतो म्हणून त्याला झाडूने मारहाण केली. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर खूप पसरला आहे. माझा साहेब बऱ्याच दिवसांपासून मला त्रास देता होता. अश्लीस संदेश पाठवत होता. मी खूप त्रासून गेल्यामुळे हे पाऊल उचलले, असे  तिचे म्हणणे आहे. 
ही घटना आहे चीनच्या हेईलोंगजियांग प्रांतातील सरकारी कार्यालयातील. ही महिला तिच्या बॉसला झाडूने मारताना, त्याच्या तोंडावर पाणी फेकताना व त्याच्या खोलीत ठेवलेली पुस्तके त्याला मारताना दिसते. हे सगळे घडत असताना तिचा बॉस त्याच्या खुर्चीत बसून राहतो व स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नांत दिसतो. महिला कधी त्याच्यावर हल्ला करताना दिसते तर कधी फोनवर बोलताना इकडे तिकडे फिरताना दिसते. महिलेचा आरोप होता की, माझ्या बॉसने मला तीन वेळा अश्लील मेसेज पाठवले. बॉस कार्यालयातील इतर महिलांशीही असेच फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मी मेसेजेस फक्त विनोद म्हणून पाठवले होते, असे हा बॉस पुन्हा पुन्हा सांगताना व्हिडिओत दिसतो.

-     या बॉसचे नाव वाँग असून तो सरकारी गरिबी निर्मूलन करणाऱ्या संस्थेत उपसंचालक होता. त्याला या घटनेनंतर नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
-     समाज माध्यमांवर या महिलेला मोठा पाठिंबा मिळत आहे. खातेअंतर्गत चौकशीत वाँग दोषी आढळला. वाँग हा शिस्त न पाळणारा अधिकारी असून तो नेहमीच त्याच्या मर्यादा विसरून जायचा. या घटनेनंतर त्याच्यावर कारवाई केली
गेली. 
- याप्रकरणी सरकारी संस्थेच्या प्रशासनाने महिलेविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. ही महिला काही मानसिक अडचणींना तोंड देत असल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला.

Web Title: Boss beaten by woman in office, used to send obscene messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.