पाकिस्तानातील एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: October 7, 2016 15:26 IST2016-10-07T14:46:24+5:302016-10-07T15:26:33+5:30

पाकिस्तानमधील रावळपिंडीला जाणा-या जफर एक्स्प्रेसमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला आहे

Bomb blast in Pakistan, four deaths | पाकिस्तानातील एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू

पाकिस्तानातील एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट, 4 जणांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत

इस्लामाबाद,दि.7 - पाकिस्तानमधील रावळपिंडीला जाणा-या जफर एक्स्प्रेसमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जण जखमी झाले आहेत.  बलुचिस्तान प्रांतातील माच गावाजवळ हा बॉम्बस्फोट झाल्याचे पाकिस्तान रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तौफील अहमद यांनी सांगितले आहे. दरम्यान, जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही अहमद यांनी सांगितले. 
 
 

Web Title: Bomb blast in Pakistan, four deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.