लिबियात पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये बॉम्बस्फोट, ६५ ठार

By Admin | Updated: January 7, 2016 17:11 IST2016-01-07T16:45:36+5:302016-01-07T17:11:42+5:30

लिबिया शहरात झ्लिटेनमध्ये असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रकबॉम्बचा हल्ला करण्यात आला असून यामध्ये ६५ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

A bomb blast at Libyan police training center, 65 dead | लिबियात पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये बॉम्बस्फोट, ६५ ठार

लिबियात पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये बॉम्बस्फोट, ६५ ठार

>ऑनलाइन लोकमत,
त्रिपोली, दि. ७ - लिबिया शहरात झ्लिटेनमध्ये असलेल्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रकबॉम्बचा हल्ला करण्यात आला असून यामध्ये ६५ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. 
येथील स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, झ्लिटेनमधील पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये ट्रकबॉम्बचा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ६५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी या ट्रेनिंग सेंटरमध्ये पोलीस भरतीच्या ट्रेनिंगसाठी आलेले अनेक सदस्य एकत्र होते, असे सांगण्यात येते.
दरम्यान, जखमींना येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

Web Title: A bomb blast at Libyan police training center, 65 dead